खडसेंच्या मुक्ताईनगरात दोन सरकारी खात्यांची जुंपली : ८२ गावात अंधार

मुक्ताईनगर तालुक्यात कराच्या थकबाकीपोटीशासनाच्याच दोन्ही विभागाने एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी थेट कार्यालयाच सिल केल्यामुळे त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरीकांना भोगावा लागत आहे.विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ आहे.
khadse-mseb-vs-revenue
khadse-mseb-vs-revenue

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात  कराच्या थकबाकीपोटी शासनाच्याच दोन्ही विभागाने एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी थेट कार्यालयाच सिल केल्यामुळे त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरीकांना भोगावा लागत आहे.विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ आहे.

महसूल आणि वीज मंडळाच्या भांडणात 82 गावांचा विज पुरवठा खंडीत झाल्याने  या गावातील जनतेला  अंधारात राहावे लागणार  आहे .  

 जिल्ह्यात मुक्ताईनगर तहसील कचेरीवर असलेल्या थकबाकिपोटी विज मंडळाने त्यांचे कनेक्‍शन कट करून अंधार केला, मग संतप्त झालेल्या तहसीलच्या अधिकाऱ्यांनीही उट्टे काढण्यासाठी चक्क अकृषक साऱ्याची थकबाकीपोटी चक्क वीज मंडळाचे 10 सबस्टेशन सील केले.मात्र याचा फटका जनतेला बसला असून चक्क 82 गावांचा वीज पुरवठा बंद झाला आहे.

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगरात हा प्रकार घडला आहे. मुक्ताईनगर येथील तहसील  कार्यालयाच्या विजबिलाची थकबाकी होती. त्यांनी वेळोवेळी नोटीस बजावूनही तहसील कार्यालयाने थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज थेट तहसील कार्यालयाची वीज बंद करून टाकली.

वीज वितरण कंपनीच्या या प्रकारामुळे तहसील कार्यालयाचे अधिकारी संतप्त झाले.

त्यांनीही विज वितरण कंपनीवर अकृषक साऱ्याची थकबाकी असल्याचे तब्बल 98 हजाराचे बिल तातडीने भरा असे तहसील विभागाला कळविले.मात्र ते बिल भरू शकत नसल्याने आपल्यावर झालेल्या कारवाईचे उट्टे म्हणून तहसील विभागाने विज वितरण कंपनीचे चक्क दहा सबस्टेशन सील केले आहेत.

त्यामुळे 82 गावांचा विज पुरवठा खंडीत झाला असून जनता अंधारात राहणार आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या ८२ गावातील नागरिक नाथा वाचवी  आता असे म्हणत आहेत . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com