साताऱ्यात आणखी आठ कोरोनाबाधित, जिल्ह्याची संख्या १४६ वर 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 146 झाली असून यापैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 71 इतकी आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त होवून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 73 आहे. तर दोघांचा मृत्यु झालेलाआहे.
Corona Patients Increased In Satara Distrit
Corona Patients Increased In Satara Distrit

सातारा : बाहेरच्या जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड होत आहे. आज मुंबईहून प्रवास करून आलेला लोणंद येथील ३३ वर्षीय व्यक्ती, अकोला येथून मायणी (ता. खटाव) येथे प्रवास करून आलेले दोघे तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविडबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेले म्हासोली येथील दोन पुरूष व तीन महिला असे एकुण आठजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. सातारा जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या  १४६ वर पोहोचली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.

आज तब्बल आठजणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेला मुंबई येथून लोणंद येथे प्रवास करुन आलेला 33 वर्षीय पुरुष, अकोला येथून मायणी (ता. खटाव) येथे प्रवास करुन आलेले  55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे म्हासोली गावातील कोविडबाधित रुग्णाच्या सहवासात आलेले दोन पुरुष आणि तीन महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


तसेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील महिलेचा अहवाल कोविडबाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणना केलेली जाणार नाही. आज कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

काल उशीरा (ता.18 मे) रोजी रात्री उशीरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील विलगीकरण कक्षात  32 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 146 झाली असून यापैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 71 इतकी आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त होवून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 73 आहे. तर दोघांचा मृत्यु झालेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com