कितीही मोठे संकट आले तरी शिक्षण सुरू ठेवणार : उद्धव ठाकरे

आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने खबरदारी घेतली आहे. तर शासनाने जबाबदारी घेतली आहे. पावसाळ्यात वाट निसरडी आहे. त्यामुळे तुम्ही सोबत असल्यावरआमचे सरकार कोणीही पाडू शकत नाही. घाई गडबडीत पाऊल टाकून चुका होऊ नयेत तसेच पायही घसरता कामा नये, जे आम्ही सुरू करू ते पुन्हा कधी बंद करणार नाही, असे वचन देऊन त्यांनी हरी ओम म्हणत फेसबुक लाईव्ह संपविले.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

सातारा : लॉकडाऊन शिथिल करताना शाळा सुरू केल्यास अन्‌ कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्या पुन्हा बंद कराव्या लागतील. पण आपण सर्वांनाच ऑनलाइन शिक्षण
देऊ शकत नाही. त्यामुळे काही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासोबतच ऑनलाइन शिक्षण कसे देता येईल, याचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्रावर कितीही मोठे संकट आले तरी शिक्षण सुरू ठेवले जाणार आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

लॉकडाऊन शिथिल करताना शाळा पुन्हा सुरू करायच्या काय, याविषयी त्यांनी सरकारची भुमिका सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेपुढे मांडली. ते म्हणाले, आपण शाळा पुन्हा सुरू करू शकतो. पण संसर्ग वाढल्यास त्या पुन्हा बंद कराव्या लागतील. पण मला यापुढे काहीही बंद करायचे नाही. मला मिशन बिगीन
अगेन...हरी ओम...चालू ठेवायचे आहे.

राज्यातील शाळा पुन्हा सुरू करायच्या का याबाबत काही तज्ञांशी मी चर्चा करत आहे. आपण सर्वांनाच ऑनलाइन शिक्षण देऊ शकत नाही. शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करायचे आहे. ग्रीन झोनमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन शाळा सुरू करू शकतो का, याची माहिती मी तज्ञांकडून मागविली आहे. शहरात ऑनलाइन शिक्षण कसे सुरू करता येईल याविषयी मोबाईल कंपनींशी मी चर्चा करणार आहे. शाळा सुरू करता येत नाही तेथे ऑनलाइन शिक्षण तर याबाबत येत्या दोन चार दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल.

मुळात कोरोनाने आपल्याला स्वतःकडे, आपल्या कुटुंबाकडे व शिक्षण तसेच आरोग्याकडे पहायला शिकविले आहे. पुढेचे आयुष्य जगताना जीवनावश्यक वस्तू व गोष्टी बंद न होऊ देता चालू ठेवाव्या लागतात. तसेच कितीही मोठे संकट आले तरी शिक्षण सुरू ठेवता येईल, यासाठी काय करावे लागेल याचाचा विचार सुरू आहे.आगामी काळात आरोग्याला प्राधान्य द्यायचे सरकारने ठरविले आहे. संसर्ग रोखणारी हॉस्पिटल सुरू करणार आहोत. रूग्ण वाढल्यास त्यांना उपचार मिळण्यासाठी
हॉस्पिटल सुविधा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. 

आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने खबरदारी घेतली आहे. तर शासनाने जबाबदारी घेतली आहे. पावसाळ्यात वाट निसरडी आहे. त्यामुळे तुम्ही सोबत असल्यावर
आमचे सरकार कोणीही पाडू शकत नाही. घाई गडबडीत पाऊल टाकून चुका होऊ नयेत तसेच पायही घसरता कामा नये, जे आम्ही सुरू करू ते पुन्हा कधी बंद करणार नाही, असे वचन देऊन त्यांनी हरी ओम म्हणत फेसबुक लाईव्ह संपविले. 
.

सेमिस्टरच्या सरासरीनुसार मार्कस्‌ देऊन पास करणार.... 

आता पावसाळा व शाळा, कॉलेज सुरू होतोय. पण या सर्वाचा विचार सुरू आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेविषयी ते म्हणाले, मी सर्वांची मते जाणून
घेतली आहेत. कुलगुरू व मुख्यमंत्री यांच्यातील पालक आजही चिंतीत आहे.

कोरोना पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परिक्षेला पाठवायचे का, असा प्रश्‍न
करून ते म्हणाले, अंतिम वर्षाचा पेपर वाटणार कसे, तपासणार कसे. यावर तोडगा काढून अंतिम वर्षाच्या परिक्षा घेताना जेवढे सेमिस्टर झाले आहेत, त्याची सरासरी
काढून त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्कस्‌ द्यायचे आहेत. त्यांना पास करायचे आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे आयुष्य सुरू राहिल. आम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन
द्यायचा नाही. त्यांची परिक्षाचा झाली नाही तर शिक्षणाचा उंबरठा पार करून बाहेरच्या जगात ते युवक प्रवेश कधी करणार,  म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे,
असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com