विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू

'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या अभियान अंतर्गत ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची निर्देश वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू
online educationSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवासापासून राज्यात कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या कमालीची वाढत चालली आहे. त्यामध्ये राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची (Online Education) सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत.

online education
नवाब मलिकांनी नाक घासून माफी मागावी; अन्यथा..

गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून खबरदारी म्हणून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

online education
गिरीश महाजनांच्या विरोधात फास आवळला : टेंपोभर कागदपत्रे ताब्यात!

सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देशही गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in