पाणी वळण योजना पुर्ण करून दुष्काळी मराठवाड्याची परिस्थीती बदलणार..

पाण्याअभावी विकास खुंटलेल्या मराठवाड्याची परिस्थिती बदलण्याचे आश्वासन शरद पवार साहेबांनी मागच्या काळात दिले होते.
पाणी वळण योजना पुर्ण करून दुष्काळी मराठवाड्याची परिस्थीती बदलणार..
Water Conservation Minister Jayant Patil News Aurangabad

औरंगाबाद ः पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या निर्माणाधीन ६ वळण योजनांपैकी, मांजरपाडा व पेगलवाडी कायोजना पूर्ण झाल्यात. (Drought will change the situation of Marathwada by completing water diversion scheme) या योजनांचं काम पूर्ण करून शासनाने वचनपूर्तीचे पहिले पाऊल टाकले असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिली.

या योजनांद्वारे गोदावरी खोऱ्यातली तूट भरून निघण्यास मदत होईल. मागील काही वर्षांपासून बंद पडलेल्या या योजनांच्या कामातील अडथळे दूर करत जलसंपदा विभागाने या योजना पूर्ण केल्या असल्याचेही ते म्हणाले. ( Ncp Water Conservation Minister Jayant Patil, Maharashtra)  या योजनांद्वारे ६३१ दलघमी (.६ टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. उर्वरित चार योजना जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे.

पाण्याअभावी विकास खुंटलेल्या मराठवाड्याची परिस्थिती बदलण्याचे आश्वासन शरद पवार साहेबांनी मागच्या काळात दिले होते.  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इतर प्रस्तावित सर्व वळण योजना लवकरच पूर्ण करण्यात येतील, मराठवाड्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही पाटील यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

काय आहे योजना..

कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  त्यासोबतच वैनगंगा नदीचे तेलंगणमध्ये जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा योजनेत ४८० किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून पूर्व आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा देखील प्रयत्न आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.

मराठवाडा हा अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे.  मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आला आहे. येथे पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्याला दिलासा देणे शक्य आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देण्याचा आणि त्यांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येणार आहे. त्यामार्गे ह े पाणी पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पोहोचेल. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यास हा मोठा दिलासा असेल. कोकणातील लहान-मोठ्या ३० नदी खोऱ्यातील वाया जाणारे ११५ अब्ज घनफूट पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात येण्यास मागील  सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती.

गेल्या काही वर्षांत मराठवाड्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. राज्याच्या भौगोलिक रचनेत दहा टक्के भाग असलेल्या कोकणात ६० टक्के पाऊस पडतो. मात्र, कोकणातील पाणी फार थोड्या प्रमाणात अडवले जाते व मोठ्या प्रमाणावर पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. मराठवाड्यात पाणी नाही आणि कोकणात पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत कोकणातील पाणी मराठवाड्यात नेण्याबाबत ३० जुलै २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले होते.

पाण्यावरून कायम संघर्ष..

प्रस्तावित नदीजोड प्रकल्प तीन-चार पाटबंधारे विकास महामंडळांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे अंमलबजावणीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचा विचार करून प्रकल्पाच्या एकसूत्री अंमलबजावणीसाठी थेट राज्य सरकारच्या अंतर्गत स्वतंत्र मुख्य अभियंता पदाची व कार्यालयाची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली होती. ठाणे येथे हे कार्यालय स्थापन केले जाणार होते.  गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे. त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष धुमसत असतो.

पाण्याचा उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.  पाण्याचा उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.  यामुळे पाच ते साडे पाच टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यासाठी नव्याने उपलब्ध होणार आहे.

पश्चिमेकडे कोकणात वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे शक्य आहे. वापराविना समुद्रात जाऊन वाया जाणारे पाणी वळण योजनांद्वारे उर्ध्व गोदावरीच्या मुळा उपनदीत आणून सोडण्यात येणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.