Don't be afraid, there will be permanent rehabilitation; Prithviraj Chavan gave relief to the flood victims
Don't be afraid, there will be permanent rehabilitation; Prithviraj Chavan gave relief to the flood victims

घाबरू नका, कायमस्वरूपी पुनर्वसन होणारच; पृथ्वीराज चव्हाणांचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा

श्री. चव्हाण म्हणाले, ''जिंती येथील वाड्यावस्त्याचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करु.

ढेबेवाडी : ''खचलेले डोंगर व दरडींमुळे अडचणीत आलेल्या गावांच्या मागणीनुसार कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, आलेल्या संकटाला आपण धैर्याने सामोरे जावू या.'' अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल रात्री जिंती व ढेबेवाडी येथे स्थलांतर केलेल्या विविध वाड्यावस्त्यातील पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. Don't be afraid, there will be permanent rehabilitation; Prithviraj Chavan gave relief to the flood victims

अतिवृष्टीमुळे ढेबेवाडी विभागात झालेल्या नुकसानीची माहिती घेवून श्री. चव्हाण यांनी धोकादायक दरडींमुळे गाव सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतलेल्या  धनावडेवाडी, शिंदेवाडी, जितकरवाडी, भातडेवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. 

महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, मनोहर शिंदे,  निलम येडगे,धनश्री महाडिक, अभिजित पाटील,  नरेश देसाई, सौ. मंदाकिनी पाटील,  वंदनाताई आचरे, अमोल पाटील, सतीश कापसे,  संगिता तिवारी, अशोकराव पाटील, दादासाहेब साळुंखे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ''जिंती येथील वाड्यावस्त्याचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करु, मात्र या ठिकाणच्या लोकांनी त्याबाबत ठाम निर्णय घेवून आवश्यक कागदोपत्री पाठपुरावा करावा''. हिंदुराव पाटील म्हणाले, ''धोकादायक दरडी, वन्य श्वापदांचा उपद्रव व मराठवाडीचा जलाशय यामुळे चोहोबाजुनी अडचणीत आलेल्या या गावांच्या पुनर्वसनासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा'. शंकरराव पवार यांनी प्रास्ताविक केले. उमेश चव्हाण यांनी आभार मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com