कुटुंबातील कोणी बोललं तर आपण नाराज होतो का? अजित पवार, पार्थ नाराज नाहीत

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून जे राज्यातील नेते, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडून गेले होते, विशेषतः भाजपमध्ये त्या सगळ्यांना आता परत यायचं आहे. भाजपमध्ये गेलेले असे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. आमदार होण्यासाठी जे भाजपमध्ये गेले होते, पण निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला असे लोक पक्षात येण्यास अधिक इच्छूक आहेत. त्यांना पक्षात घेण्यात कुठल्याही अडचणी नाहीत.
jayant patil said ajeet and parth pawar not upset news
jayant patil said ajeet and parth pawar not upset news

मुंबई ः कुटुंबातील एखादी वरिष्ठ व्यक्ती आपल्याला बोलली तर आपण नाराज होतो का? शिवाय आजोबांना सगळं बोलण्याचा अधिकार असतोच. त्यामुळे अजित पवार आणि पार्थ देखील नाराज नाहीत. तुम्हाला कुणी सांगितलं ते नाराज आहेत? असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पवार घराण्यातील नाराजीच्या चर्चेवर भूमिका स्पष्ट केले. मंत्रालयात असलेल्या अजित पवारांची सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भेट ही कामासाठी असेल, त्यावरून काही तर्क लावणे चुकीचे ठरेल असे सांगत त्यांनी पक्षात किंवा पवार कुटुंबात कुठल्याही प्रकारचे वाद किवा नाराजी नाही, असे नमूद केले. 

राम मंदिर आणि चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर होत असलेली सीबीआय चौकशीची मागणी या दोन मुद्यांवर अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटवरून सध्या राज्यात वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे.

पार्थ यांच्या बोलण्याला आम्ही कवडीची किमंत ते नाही, ते अपरिपक्व आहे, अशी तिखट प्रतिक्रिया पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केल्यानंतर तर राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवार नाराज आहेत, ते शरद पवारांच्या भेटीला गेल्याच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले. या सर्व विषयांसह राज्यातील इतर राजकीय घडामोडींवर जयंत पाटील यांनी भाष्य केले.

जयंत पाटील म्हणाले, पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादी पक्षात कुठल्याही प्रकारचे वाद, नाराजी नाही. एखाद्या विषयावरून असे मत बनवणे योग्य नाही. अजित पवार यांनी शरद पवारांची सिल्वर ओकला जाऊन घेतलेली भेट ही पूर्वनियोजित होती, यावेळी पक्ष वाढीसाठीची चर्चा त्या बैठकीत झाली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून जे राज्यातील नेते, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडून गेले होते, विशेषतः भाजपमध्ये त्या सगळ्यांना आता परत यायचं आहे. भाजपमध्ये गेलेले असे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. आमदार होण्यासाठी जे भाजपमध्ये गेले होते, पण निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला असे लोक पक्षात येण्यास अधिक इच्छूक आहेत. त्यांना पक्षात घेण्यात कुठल्याही अडचणी नाहीत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदल्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते फेटाळून लावतांनाच युती सरकारच्या काळात म्हणजेच २०१४ पासून झालेल्या बदल्यांची माहिती काढून आम्ही या सर्वांची चौकशी करू, असा इशारा द्यायला देखील जयंत पाटील विसरले नाही.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com