शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी जावळीकरांसोबतच कायम; बाहेरून येणाऱ्यांच्या मागे धावू नका...

गेल्या 12 वर्षापासून जावलीच्या जनेतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही, असे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी जावळीकरांसोबतच कायम; बाहेरून येणाऱ्यांच्या मागे धावू नका...
Do not run after those who come from outside; I stay with Jawalikars : Shivendraraje

सातारा : मी कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही. जे लोक तालुक्यात कार्यरत आहेत. तुमच्या सुखदुखात तुमच्या सोबत आहेत. त्यांच्याबरोबर, त्यांच्या पाठीशी ठाम राहा. मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या पाठीमागे धावू नका. राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला कायम प्राधान्य दिले असून जावलीतील जनतेला सोडून मी कधीही जाणार नाही, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. Do not run after those who come from outside; I stay with Jawalikars : Shivendraraje

जावळी तालुक्यातील सर्जापुर ग्रामपंचायतीच्या नुतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण कँम्पचे उद्‌घाटन अशा विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जावलीचे उपसभापती सैारभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच सौ. स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे यांच्यसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

गेल्या 12 वर्षापासून जावलीच्या जनेतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम रहा, असे आवाहन त्यांनी केले. अतुल बोराटे यांनी सुत्रसंचालन केले. नितिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. किर्तनकार नलावडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.