`तेव्हा' डावलले; आता तरी राजू शेट्टींना डावलू नका'

"महाविकास आघाडीची सत्ता आणायला राजू शेट्टींचे मोठे योगदान आहे. आम्हाला वाटत होते त्यांना मंत्री करतील; पण तेव्हा डावलले. आता डावलू नका," असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी म्हटले आहे.
do not ignore raju shetti urges swabhimani sanghatana to ncp
do not ignore raju shetti urges swabhimani sanghatana to ncp

पुणे - "महाविकास आघाडीची सत्ता आणायला राजू शेट्टींचे मोठे योगदान आहे. आम्हाला वाटत होते त्यांना मंत्री करतील; पण तेव्हा डावलले. आता डावलू नका," असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून केली जात आहे. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीने आमदार करावे असाच `स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांचा सूर आहे.

"राजू शेट्टी हे चळवळीतील नेते आहेत. त्यांना सत्तेची गरज नाही. शेट्टी यांना आमदार केल्याने त्यांचा स्वतःचा काही फायदा होणार नाही. मात्र महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांचा नेता जर विधानपरिषदेत आला तर शेतकऱ्यांचा तो सन्मान ठरेल. राजू शेट्टी यांच्यासारख्या अभ्यासू माणूस सभागृहात आला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटेल," असे खराडे यांनी म्हटले आहे.

"लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीशी युती केली. त्यांच्या प्रतिमेचा या दोन्ही पक्षांना फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत शेट्टींनी भाजपच्या विरोधात रान उठवले होते. भाजपचे शेतकरीविरोधी धोरण त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला," असे खराडे म्हणाले.

"महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर शेट्टी यांना कृषिमंत्री करतील असे आम्हाला वाटत होते; मात्र तेव्हा डावलले. आता तरी शेट्टी यांना संधी द्यावी," असे खराडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान शेट्टीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर राजू शेट्टी यांना आमदार करा, अशी मागणी जोरदारपणे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com