ॲड. उदयसिंह उंडाळकरांची मुंबईत खलबते; कृष्णासह जिल्हा बॅंकेसाठी घेतली शरद पवारांची भेट

कृष्णा कारखाना व जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उंडाळकर गटाची ताकद पुन्हा सक्रीय झाली आहे. कऱ्हाड दक्षिणेत उंडाळकर गटाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाशी सलोखा झाला आहे. त्यामुळे दक्षिणेत काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्याचा कारखाना निवडणुकीत कसा फायदा करून घेता येईल, यासाठी राष्ट्रवादीने अविनाश मोहिते यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे.
With District Bank. For Krishna factory Advt. Udaysingh Undalkar met Sharad Pawar
With District Bank. For Krishna factory Advt. Udaysingh Undalkar met Sharad Pawar

कऱ्हाड : कृष्णा कारखान्यासह जिल्हा बॅंकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाची नेमकी काय भूमिका राहणार याचीच उत्सुकता लागली असतानाच त्या गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी काही मोजक्‍याच नेत्यांना सोबत घेऊन मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्या बैठकीत कृष्णा कारखान्यासह जिल्ह बॅंकेच्या निवडणूकीबाबत श्री. पवार व ॲड. उदयसिंह उंडाळकर यांच्यात पाऊणतास कमराबंद चर्चा झाली. त्यामुळे कृष्णा कारखान्यात ॲड. पाटील व अविनाश मोहिते यांच्यातील एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. 

कृष्णा सहकरी साखर कारखान्याची निवडणुक लवकरच होत आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस व राष्ट्रवादीने कृष्णा कारखाना लक्ष्य केले आहे. राज्यात स्थापन महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर रेठऱ्याच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना दोन्ही काँग्रेसच्या टार्गेटवर आहे.

जिल्ह्यातील कऱ्हाडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्‍यांत कृष्णाचे कार्यक्षेत्र आहे. त्या तालुक्‍यातील राजकारणावर कारखान्याचा प्रभाव आहे. कृष्णा कारखान्याचा सातारा, सांगली जिल्ह्यातील 132 गावातील कार्यक्षेत्रात दोन्ही पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे आता त्याच ताकदीवर कृष्णा कारखाना पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आला पाहिजे, यासाठी आता दोन्ही पक्षातील नेते सक्रीय आहेत.

त्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेसने ताकद लावली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात हालचाली गतीमान झाल्या आहेत. मुंबईत माजी मुख्यमंत्र्यासह दोन विद्यामान मंत्र्यासह आमदारांच्या समर्थकांची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत सातारा, सांगली जिल्ह्यातील नेत्यांसह महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत त्याच अनुषंगाने हालचाली झाल्या आहेत. 

कृष्णा कारखाना व जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उंडाळकर गटाची ताकद पुन्हा सक्रीय झाली आहे. कऱ्हाड दक्षिणेत उंडाळकर गटाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाशी सलोखा झाला आहे. त्यामुळे दक्षिणेत काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्याचा कारखाना निवडणुकीत कसा फायदा करून घेता येईल, यासाठी राष्ट्रवादीने अविनाश मोहिते यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीने अविनाश मोहिते यांच्यासोबत ताकद ठेवली आहे.

त्यामुळे कृष्णासह जिल्हा बॅंकेत नेमकी काय भूमिका घ्यायची, त्याला राष्ट्रवादीची साथ असणार का, यासाठी ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व त्यांच्या काही महत्वाच्या नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. ॲड. उंडाळकर यांनी मुंबईत काल (शुक्रवारी) रात्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी दोन्ही निवडणुकांबाबत श्री. पवार यांच्याशी एकांतात चर्चा केली.

त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले उंडाळकर गटाचे प्रमुख नेतेही चर्चेत सहभागी झाले होते. अविनाश मोहिते यांच्या गटासोबत राहण्यासाठीची व्यूव्हरचना आखली जाणार आहे. त्यासोबतच जिल्हा बॅंकेतही स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या काळात नव्या राजकीय वळणाला सुरवात होणार असल्याचेही संकेत यातून मिळाले आहेत. 

ॲड. उदयसिंह उंडाळकर यांची भूमिका महत्वाची 

ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतर जिल्हा बॅंकेसह व कृष्णा कारखान्याची पहिली निवडणुक होत आहे. त्या निवडणुकीत बऱ्यापैकी बेरजेचे राजकारण करण्याचा उंडाळकर गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील यांनी प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी व्यक्तीगत गाठीभेटही घेतल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात कृष्णा व जिल्हा बॅंकेत ॲड. उदयसिंह यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com