पुणे पदवीधर मतदार संघासाठी या दोन नावाची चर्चा  

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड यांची तर भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे.
lad.jpeg
lad.jpeg

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपकडून अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन नेत्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड यांची तर भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांना जर उमेदवारी मिळाली तर पलूस कडेगाव मतदारसंघ राज्यात चर्चेचा ठरेल.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळेस क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मग त्यांनी पुरोगामी चळवळ, डावे पक्ष इतर संघटनेच्या बळावर उमेदवारी केली. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. य वेळेस ते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्यावेळेचे उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने अरुण लाड यांचा दावा प्रबळ मानला जात असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. सध्या ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत ते पलूस कडेगाव मतदारसंघात भाजपकडून इच्छुक होते. पलूस येथे महाजनादेश यात्रा आली होती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

मात्र, जागा वाटपात जागा शिवसेनेला गेल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही याचे शल्य त्यांना आहे. भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू केल्याची चर्चा आहे. देशमुख यांनीही तयारी सूरु केली आहे. पलूस कडेगाव मतदारसंघात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रबळ इच्छुक आहेत. अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र, तशी उमेदवारी जाहीर झाली तर या मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे.
Edited  by : Mangesh Mahale   

हेही वाचा : उद्योगांचे जाळे विस्तारल्याने 'या' शहराला पसंती  

नाशिक : मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे या मुंबई पासून नजीक असलेल्या भागात सर्वाधिक बांधकामांची नोंद झाल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक नागरीकरणाचा पट्टा म्हणून उदयाला आला आहे. देशात सर्वाधिक नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण वाढत असल्याचे ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या मोठ्या बांधकामांच्या प्रकल्प नोंदणीवरून स्पष्ट होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com