आमदार क्षीरसागरांकडून सुडाचे राजकारण; विकासकामात खोडा

पालिकेमार्फत ही कामे झाली तर येणार्‍या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याला जनता मागे फेकेल, अशी आमदारांना भिती.
Ncp Mla Sandip Kshirsagr-Dr.Bharatbhushan Kshirsagar Beed News Politics
Ncp Mla Sandip Kshirsagr-Dr.Bharatbhushan Kshirsagar Beed News Politics

बीड : शहरातील विकासाची कामे पालिकेमार्फत झाली तर स्वत:ची किंमत कमी होईल, म्हणून स्थानिक आमदार सुडाचे राजकारण करत आहेत. जाणिवपूर्वक विकास कामे आडवित असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला. (Dirty politics from MLA Kshirsagar; Engage in development work) शहरात व मतदार संघात माफियागीरी, गुंडगिरी वाढली असून वाळू माफियांचा सुळसुळाट असून याला तेच जबाबदार असल्याचा हल्लाबोलही क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला.

आम्ही दहा कोटींची कामे केली तर तुम्ही २० कोटींची करुन निकोप विकासाची स्पर्धा करा, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, सत्तेचा दुरुपयोग करुन दलित वस्ती, दलित्तेतर विकास व वैशिष्ट्यपूर्ण कामे, निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला गेला आहे. (Ncp Mla Sandip Kshirsagar Beed)  केवळ बीड, धारुर व गेवराई नगर पालिकेबाबत असा दुजाभाव केला जात आहे. यापूर्वीच्या कोणत्याच पालकमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली नव्हती.

यापूर्वी शहरातील कोणत्याच आमदारांनी पालिकेच्या विकासाला खोडा घातला नाही, मात्र विद्यमान आमदारांकडून जाणिवपूर्वक खोडा घालून विकासात आणि मागासवर्गीयांच्या विकासात आडकाठी आणली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Dr. Bharatbhushan Kshirsagar Nagradhkshya Beed) यंत्रणा बदलूनही चार महिन्यांपासून कामे ठप्प असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. 

विकास कामे करण्यात पालिकेची यंत्रणा सक्षम आहे. शहरात १३५ कोटी रुपयांच्या कामांसह २०० कोटी रुपयांची अमृत अटल व भुयारी गटार योजनाही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आमदारांकडून पदाचा दुरुपयोग करुन नगर पालिकेचा संविधानिक हक्क हिसकावून घेतला जात आहे. शहरातील १६ नवीन डीपी रस्त्यांसाठी ८८ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. मात्र, शहराच्या वैभवात भर घालणार्‍या विकासकामात अडथळा आणला जात आहे.

जनता मागे फेकेल याची भिती?

पालिकेमार्फत ही कामे झाली तर येणार्‍या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याला जनता मागे फेकेल, अशी आमदारांना भिती असल्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नगरपालिकेला आलेला निधी अडवण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा पुनरुच्चारही क्षीरसागर यांनी केला. गरिबांची शेकडो घरकुलांची कामे आमदारांनी अडविल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी शहरातून जाणाऱ्या जालना रोड व नगर रोडवरील खड्ड्यांचे व्हिडीओ चित्रण दाखविण्यात आले. आमदारांकडून बारमाही मंत्र्यांना भेटीचे फोटो टाकले जातात. मग, ही कामे का होत नाहीत, असा सवाल डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला. पालिकेच्या कामांत खोडा घालण्याऐवजी स्वत:च्या अखत्यारितील विकास कामे करा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in