संजयमामा शिंदे व माझ्याशी चर्चा केल्यानंतरच धवलसिंह यांचा निर्णय झाला...

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या काॅंग्रेस प्रवेशाने माळशिरसमधील नवी राजकीय चर्चा
sanjaymama shinde- Dhawalsinha mohite patil-uttam Jankar
sanjaymama shinde- Dhawalsinha mohite patil-uttam Jankar

पुणे : धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतून काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने माळशिरस मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. मोहिते पाटील यांच्यासाठी काॅंग्रेसनेही पायघड्या अंथरल्या आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मोहिते पाटील यांच्या प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते न फोडण्याचे संकेत बोलून दाखवले असले तरी ही फोडाफोडी सुरूच असते. या स्पर्धेत उतरत काॅंग्रेसनेही मोहितेंच्या प्रवेशासाठी हिरवा कंदिल दाखवला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी अलीकडेच विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या या मागणीकडे पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष तर केलेच शिवाय त्यांना पक्ष संघटनेत देखील कुठेच संधी दिली गेली नाही. विधानसभा निवडणुकीत डाॅ. धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्यासाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रयत्न केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा वेळी धवलसिंह यांनी राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे जानकर हे जोरदार टक्कर दिली होती.

या साऱ्या घडामोडींबाबत जानकर म्हणाले की मोहिते पाटील यांना काॅंग्रेसमध्ये योग्य स्थान मिळू शकते. त्यांच्या तेथे अधिक चांगला सन्मान होईल. म्हणूनच ते तिकडे गेले आहेत. काॅंग्रेस प्रवेशाचा निर्णय घेण्याआधी आमदार संजयमामा शिंदे व माझी मोहिते पाटलांशी चर्चा झाली होती. त्यानंतरच त्यांनी तो निर्णय घेतला, अशी पुस्ती जानकर यांनी जोडली.

याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे यांना विचारले असता, ते म्हणाले धवलसिंह यांनी राष्ट्रवादीत काम करावे अशी माझी सुरवाती पासून खूप इच्छा होती. त्यांच्यात काम करण्याची धमक आहे. पक्षाने देखील त्यांना काम करण्याची संधी दिली असती तर त्यांनी नक्कीच ती जबाबदारी स्वीकारली असती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजयमामा शिंदे यांनी मात्र धवलसिंह यांच्या काॅग्रेस पक्ष प्रवेशा बद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी ऐवजी काॅग्रेसमध्ये का प्रवेश केला हे त्यांनाच विचारलं तर  बरं होईल असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. माझा वाद त्यांच्याशी नव्हता, असेही शिंदे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com