धनंजय मंडेंकडून बहीण पंकजा यांच्या तब्येतीची विचारपूस

भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची (Covid-19) लागन झाली आहे.
dhananjay-pankaja-munde
dhananjay-pankaja-munde

Sarkarnama

बीड : बीडचे राजकारण म्हटल की भावा बहीणीचा राजकीय संघर्ष बघायला मिळतो. मात्र, काही प्रसंगी राजकारण बाजूला सारत राष्ट्रवादीचे (NCP) नेते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे बहीण-भाऊ आस्थेने एकमेकांची विचारपूस करतात. असेच आज (ता.2 जानेवारी) घडले. पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Covid-19) लागण झाल्याचे समजले आणि लगेचच धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा यांना मेसेज करुन तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. 'पंकजाताई दुसऱ्यांदा कोरोना झालाय, काळजी घे', असा सल्ला त्यांनी मेसेजद्वारे दिला आहे.

dhananjay-pankaja-munde
पंकजा मुंडेंना ओमायक्रॅानची लागण;पाहा व्हिडिओ

आज धनंजय मुंडे हे बीडमधे होते. यावेळी त्यांना पत्रकारांना बहीण पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आपण याबाबत पंकजाताई यांची विचारपूस केली की नाही, असा प्रश्न विचारला. यावर बोलतांनी मुंडे म्हणाले की, "मी पंकजाताईला फोन तर करु शकलो नाही, मात्र मेसेजद्वारे सांगितलं की तुला दुसऱ्यांदा कोरोना झालाय. कोरोना काळात काळजी घेणं फार महत्वाचं असतं. त्यामुळं सध्या विशेष काळजी घेण्याची गरज आहे, तू व्यवस्थित काळजी घे", असा सल्ला दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही भाऊ-बहीण असले तरी त्यांच्यातले राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्याची ते एकही संधी दोघेही सोडत नाहीत. मात्र, आजही कौटुंबिक सलोखा कायम आसल्याची प्रचिती कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानही महाराष्ट्राला बघायला मिळाली होती. पंकजा- धनंजय दोघांनाही कोरोना झालेला असताना दोघांनीही एकमेकांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. यावेळी अनेक नेटकऱ्यांनी दोघांनी आपसातील वाद मिटवत एकत्र येण्याचे सल्ले दिले होते.

dhananjay-pankaja-munde
पाच मंत्री, 25 आमदारांना कोरोना; पंकजा मुंडे या ओमिक्राॅन `पाॅझिटिव्ह`

दरम्यान, कोरोना पुन्हा डोक वर काढत असल्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा घरातच राहावे. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, शासनाने घालून दिलेले कोरोनाविषयक सर्व नियम पाळावेत, असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com