Cybercrime increased during the lockdown Says Home Minister Anil Deshmukh | Sarkarnama

लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हे वाढले : अनिल देशमुख 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 मे 2020

टिकटॉकच्या माध्यमातून ऍसिड हल्ला आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडीयोही प्रसारित करण्यात आले. पण लक्षात ठेवा महाराष्ट्र सायबर क्राईम आपल्यावर लक्ष ठेवून आहे. या विभागाने आजपर्यंत ४१० गुन्हे दाखल केले असून २१३ जणांना आतापर्यंत अटक केली आहे.

सातारा : राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. समाजमाध्यमांच्या माध्यमातून भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, अफवा पसरवणे अशा चुकीच्या गोष्टी होत आहे. पण लक्षात ठेवा सायबर क्राईम विभाग आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. जो कोणी अशा पोस्‍ट आणि व्हिडीओ व्हायरल करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. 

सायबर क्राईमच्या घटना लॉकडाऊन काळात वाढल्याबद्दल श्री. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवरून जनतेला याबाबत आवाहन केले.

हेही वाचा ः कोरोना बॉम्ब : साताऱ्यात ४० रूग्ण वाढले, पुन्हा निर्बंध वाढणार

मंत्री देशमुख म्हणाले, लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सायबर गुन्ह्यात मोठ्याप्रमाणात वाढ झालेली आहे. व्हॉट्सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, टिकटॉक या सर्व माध्यमांचा वापर करून काहीजण भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, अफवा पसरवणे अशा चुकीच्या गोष्टी करत आहेत. कृपया करून अशा गोष्टी करू नका. 

आवश्य वाचा ः ठाकरेंपाठोपाठ अजितदादाही बनले चालक!

मधल्या काळात टिकटॉकच्या माध्यमातून ऍसिड हल्ला आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडीयोही प्रसारित करण्यात आले. पण लक्षात ठेवा महाराष्ट्र सायबर क्राईम आपल्यावर लक्ष ठेवून आहे. जो कोणी अशा पध्दतीच्या पोस्ट आणि व्हिडीयो टाकेल त्यांच्यावर महाराष्ट्र सायबर क्राईमच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, सायबर क्राईम विभागाने आजपर्यंत ४१० गुन्हे दाखल केले असून २१३ जणांना आतापर्यंत अटक केली आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख