२० हजारांच्या लाचप्रकरणी मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा

तलाठी यांनी प्रमाणित केलेली नोंद कायमठेवण्यासाठी तक्रारदाराकडे श्री. निकम यांनी २७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर २० हजार देण्याचे ठरले होते.
२० हजारांच्या लाचप्रकरणी मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा
Crime against Mandal officer in bribery case of Rs 20,000

कऱ्हाड : खरेदी गुंठेवारी प्लॉटची तलाठ्यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी उंडाळे येथील मंडलाधिकारी नागेश निकम यांनी २० हजार रूपयांची लाच मागितल्याबद्दल त्यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सांगली येथील लाचलुचपत प्रतिंबध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. Crime against Mandal officer in bribery case of Rs 20,000

यासंदर्भात संबंधित तक्रारदाराकडे उंडाळेचे मंडलाधिकारी श्री. निकम यांना या कामासाठी २७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावर तडजोडीच्या चर्चे अंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. याबाबत संबधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंडलाधिकारी नागेश निकम यांच्या विरोधात सांगलीच्या पथकाने कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचेची मागणी केल्याबद्दलचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तलाठी यांनी प्रमाणित केलेली नोंद कायम ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे श्री. निकम यांनी २७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर २० हजार देण्याचे ठरले होते.

त्याबाबत आज कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, विना जाधव, बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली.

Related Stories

No stories found.