हुकूमशाही प्रवृत्ती ठेचण्यासाठी देशाला आणखी एका क्रांतीची गरज

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म स्वीकारले, बलिदान दिले या सर्वांची आम्हाला आठवण आहे, त्यांना कधीही विसरता येणार नाही. आज देशातील सामाजिक सलोखा, एकोपा कायम राखून या देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे. या विरोधातील जी विचारसरणी आहे, जे संविधानाच्या मुळ तत्वाच्या विरोधात सुरू असेल ते हाणून पाडण्याचा निर्धार आपण या क्रांतीदिनाच्या निमित्ताने करू या.
ashok chavan twite on august kranti day news
ashok chavan twite on august kranti day news

औरंगाबादः ९ आॅगस्ट १९४२ याच दिवशी महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आॅगस्ट क्रांती मैदानात चलेजावचा नारा देऊन एका मोठ्या स्वंतत्र आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते, अरुणा असफ अली यांनी झेप घेत आॅगस्ट क्रांती मैदानात तिरंगा झेंडा फडकावला होता. आज देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी देशात हुकूमशाही प्रवृत्ती वाढत आहे, त्याच्या विरोधात पुन्हा आॅगस्ट क्रांती दिनासारख्या आंदोलनाची गरज असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून या आंदोलनाची आठवण करून देत देशातील विद्यमान परिस्थितीवर भाष्य केले. अशोक चव्हाण म्हणाले, ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून देशाला स्वतंत्र करण्यासाठी आजच्याच दिवशी १९४२ मध्ये क्रांती मैदानात चलेजावचा नारा देण्यात आला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वानी एकत्र मिळून केलेले आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात फोडा आणि झोडा हे धोरण अवंलबले होते.

देशाला ब्रिटीशाच्या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात मोठा स्वांतत्र लढा उभारला होता. त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्वाचा आणि ऐतिहासिक होता. एकता, अखंडता आणि बंधुभावाचे प्रतिक म्हणून या आॅगस्ट क्रांती आंदोलनाकडे पाहिले जाते. देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहला गेलेला हा आजचा दिवस. याच दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या हुकूमशाही विरोधात चलेजावचा लढा देणाऱ्या सर्व नेत्यांना इंग्रजांनी अटक केली होती. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी फोडा आणि झोडा ही निती अवलंबत इंग्रजांनी प्रचंड दडपशाही सुरू केली होती.

१९४२ ते २०२० मधील प्रवास जर आपण पाहिला तर आजची विद्यमान परिस्थिती आणि ब्रिटीशांचा काळ यांची तुलना केली तर आज पुन्हा देशाला मिळालेले स्वातंत्र अबाधित राखण्याची आपली जबाबदारी वाढली आहे. देशामध्ये हुकूमशाही प्रवृती, सामाजिक सलोख्यात दरी पाडण्याचे काम व त्यातून राजकीय फायदा उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याला आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्याचे काम आपण केले पाहिजे.

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म स्वीकारले, बलिदान दिले या सर्वांची आम्हाला आठवण आहे, त्यांना कधीही विसरता येणार नाही. आज देशातील सामाजिक सलोखा, एकोपा कायम राखून या देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे. या विरोधातील जी विचारसरणी आहे, जे संविधानाच्या मुळ तत्वाच्या विरोधात सुरू असेल ते हाणून पाडण्याचा निर्धार आपण या क्रांतीदिनाच्या निमित्ताने करू या, असे आवाहन देखील अशोक चव्हाण यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com