उपराजधानीत कोरोनाच्या मृत्यूचा कहर सुरूच, आतापर्यंत १७०२ बळी

मेडिकलमध्ये २४ तासांमध्ये २० तर मेयोत १९ जण कोरोनाच्या बाधेने दगावले आहेत. उर्वरित ६ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून दोन महिन्यांत खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान दगावणाऱ्यांची संख्या २०२ वर पोहोचली आहे.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : कोरोनाची दहशत काय आहे, हे आता नागपूरकरांना कळू लागले आहे. दररोज दोन हजारांच्या जवळपास लोक पॉझिटिव्ह येत आहेत आणि रोज मरणाऱ्यांची संख्या सरासरी ५० झाली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स कमी पडू लागले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ही बाब खुद्द महापौर संदीप जोशी यांनी कबूल केली आहे. त्यामुळे रुग्णांना परजिल्ह्यांत आणि परराज्याकडे धाव घ्यावी लागत आहे. कोरोनाचे संक्रमण याच गतीने सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यत ५३ हजार ४७३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ४० हजार ६६७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, कोरोनाच्या मृत्यूचा कहर सुरूच आहे. काल ४५ बळी गेल्यामुळे मृत्यूचा आकडा १७०२ वर पोहोचला आहे. आजघडीला नागपुरात ११ हजार १०४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत अचानक पन्नास टक्के घट झाली. तर, कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का वाढला. १००२ रुग्णांची भर पडली. तर, १५१८ जणांनी कोरोनावर मात केली. 

सप्टेंबरच्या १४ दिवसांमध्ये २३ हजार ९१८ बाधित आढळून आले. तर यातील ६५५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूसह बाधितांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ ही अतिशय धोकादायक आहे. यामुळे नागपूरचे प्रशासन हादरले आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या शासकीय आरोग्य यंत्रणांची मर्यादा स्पष्ट झाली आहे. तरीदेखील गरिबांच्या मदतीला मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका धावून येत आहेत. नागपुरात सध्या मेयो, मेडिकल, लता मंगेशकर रुग्णालयासह जिल्ह्यातील ६० कोविड रुग्णालयांत ४ हजार ५१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर होम क्वारंटाइनमध्ये ६६७५ कोरोनाबाधित आहेत. काल एम्समध्ये केवळ १९८ चाचण्या झाल्या आहेत. यांपैकी ९८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

मेडिकलमध्ये ५६२ तर मेयो रुग्णालयात ४८८ चाचण्या झाल्या आहेत. मेयो आणि मेडिकलमध्ये सोमवारी प्रत्येकी १४१ रुग्ण आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेत ६७३ नमुने तपासण्यात आले असून, यातील २२३ जण बाधित आढळले. दोन महिन्यांपासून खासगीतील नमुने तपासणीचा टक्का वाढला आहे. मेडिकलमध्ये २४ तासांमध्ये २० तर मेयोत १९ जण कोरोनाच्या बाधेने दगावले आहेत. उर्वरित ६ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून दोन महिन्यांत खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान दगावणाऱ्यांची संख्या २०२ वर पोहोचली आहे. 

चाचण्यांचा टक्का घसरला 
नागपुरातील चाचण्यांचा टक्का काल पन्नास टक्के घसरला. यामुळे कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी नागपुरात चाचण्यांची संख्या १० हजारांच्या जवळपास पोहोचली होती. मात्र, सोमवारी अवघ्या ४ हजार ६३३ चाचण्या झाल्या. 

कोरोनामुक्तीचा टक्का वाढला 
सरकारी रुग्णालयात होत असलेल्या उपचारामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. महिन्याभरापूर्वी ४६ टक्क्यांपर्यंत रुग्ण बरा होण्याचा दर घसरला होता. परंतु, महिन्याभरानंतर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तब्बल ३० टक्क्यांनी बरा होण्याचा दर वाढल्यामुळे प्रशासनासाठी ही बाब दिलासादायक आहे. सध्या कोरोनामुक्तीचा दर ७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

असे आहेत मृत्यू 
-मेडिकल - ८२४ 
-मेयो - ६७५ 
-खासगी रुग्णालय -२०२ 
-एम्स - १
(Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com