धक्कादायक : महाबळेश्वरात कोरोना संशयिताची आत्महत्या

संबंधित व्यक्तीला दारूचे व्यसन होते व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला नैराश्य आल्याचे गावातील लोकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
Corona Suspected Patient Suiside In Mahabaleshwar
Corona Suspected Patient Suiside In Mahabaleshwar

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये काल (शनिवारी) दखल झालेल्या झांझवड येथील एका कोरोना संशयित रूग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. 

संबंधित व्यक्तीला दारूचे व्यसन होते व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला नैराश्य आल्याचे गावातील लोकांकडून सांगितले जात आहे.  दरम्यान प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत कोणती खबरदारी घ्यायची या सुचना केल्या. महाबळेश्वर शहर आज कोरोनामुक्त असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबईवरून आलेल्या काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस येत आहे. 

आजअखेर अशा प्रकारे मुंबई वरून आलेल्या 18 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये गोरोशी गावातील एकाचा समावेश आहे. याच रूग्णाबरोबर आत्महत्या केलेला इसम मुंबईवरून आला होता. मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास त्या दोघांनी एकत्रित केल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे गृहीत धरून तालुका प्रशासनाने या व्यक्तीस शनिवारी महाबळेश्वर तालुका कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले होते.

शनिवारीच त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी सातारा येथे पाठविले होते. रविवारी (आज) सकाळी या व्यक्तीने खोलीतील एका वॉश बेसिनच्या नळाला गळफास घेवुन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कोरोना केअर सेंटर व परिसरातील सर्व भागात प्रवेश बंदी केली होती. त्या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, पोलिस निरीक्षक बी.ए.कोंडुभैरी, तालुका वैदयकिय अधिकारी अजय कदम, पालिका मुख्याधिकारी अमिता दडगे पाटील, गट विकास अधिकारी नारायण घोलप आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आत्महत्या केलेल्या कोराना संशयित व्यक्तीवर प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी संबंधित त्याचे मोजकेच नातेवाईक व प्रमुख अधिकारी उपस्थिती राहणार आहेत. 

पांचगणी येथील सिध्दार्थनगर मधील १५ जणांना बेलएअर येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. याच कक्षात ग्रामीण भागातील दहा जणही ठेवण्यात आले होते. या सर्वांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तळदेव येथील इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या सर्वांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com