कोरोनाबाधित कोरियात अन्‌ खंडाळ्यात क्वारंटाईन

कोरियातील विद्यापीठात सदर महिला उच्च पदस्थ अधिकारी आहे. ही महिला खंडाळा येथील असून तेथे ती 21 मार्चपासून वास्तव्यास होती. 28 एप्रिलला त्या कोरियाला जाण्यासाठी निघाल्या.
Khandala Quarantine
Khandala Quarantine

खंडाळा (जि. सातारा) : कोरियावरुन येऊन गेले 40 दिवस खंडाळा येथे राहून परतलेली उच्च पदस्थ महिला अधिकारी विशेष विमानाने कोरियात गेली. पण तेथे केलेल्या तपासणीत ती कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरियातील प्रशासनाकडून भारताच्या परराष्ट्र विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित महिला अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात आलेल्या 30 जणांपैकी 25 जणांना शिरवळ येथे विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर पाच जणांना होम क्वारंटाईन केले आहे.


कोरियातील विद्यापीठात सदर महिला उच्च पदस्थ अधिकारी आहे. ही महिला खंडाळा येथील असून तेथे ती 21 मार्चपासून वास्तव्यास होती.  28  एप्रिलला कोरियाला जाण्यासाठी निघाल्या. उच्च पदावर त्यांची नियुक्‍ती असल्याने तेथील विद्यापीठाने भारतात असलेल्या सर्वांसाठी खास विमान पाठवून कोरियात परत बोलाविल होते.

तत्पुर्वी संबंधितांची मुंबई विमानतळावर कोरोनाची तपासणी झाली. त्यामध्ये ही महिला अधिकाऱ्याचा अहवालनिगेटीव्ह आला. त्यामुळे त्या विशेष विमानाने कोरियात निघून गेल्या. मात्र, तेथे पोचल्यावर झालेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. याबाबतची माहिती भारतीय परराष्ट्र विभागास मिळाल्यानंतर सुत्रे हालली. त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याशी संपर्कात आलेल्या ३० पैकी २५ जणांना शिरवळ येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर पाच लोकांना  होम क्‍वॉरंटाईन केले आहे. या संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.अविनाश पाटील यांनी दिली.या सर्व बाबी गांभीर्याने घेत खंडाळ्यातील परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच नगरपंचायतीकडून मेडीकल सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. प्रत्येक चौकात पोलिसांकडून वाहनांची तपासणी होत आहे. खंडाळ्यात पुन्हा सर्व्हेक्षणासाठी 31 पथके, सहा पर्यवेक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com