शेजारी जामखेडमध्ये कोरोना, आपला श्रीगोंदे दूरच बरा

शेजारील जामखेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असले, तरी सुदैवाने श्रीगोंदे मतदारसंघात रुग्ण नाहीत. येथील अनेकांचा शेजारील जामखेड व नगरशी संपर्क होत असतो. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
babanrao pachpute
babanrao pachpute

श्रीगोंदे : शेजारच्या जामखेड-कर्जत मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण आढळले. सुदैवाने आपल्याकडे नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असे अवाहन करीत कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार जनतेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
पत्रकात पाचपुते यांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ते कुठलीही प्रसिद्धी न करता, गावोगाव धान्यवाटप करीत आहेत. जनतेने लॉकडाउनमधील नियमांचे पालन करावे. शेजारील जामखेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असले, तरी सुदैवाने श्रीगोंदे मतदारसंघात रुग्ण नाहीत. येथील अनेकांचा शेजारील जामखेड व नगरशी संपर्क होत असतो. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. आपल्या मतदारसंघात एकही कोरोनाबाधित आढळणार नाही, याची दक्षता घ्यावी. लॉकडाउन उठेल, त्या वेळी आपला मतदारसंघ लवकरच पूर्वपदावर येईल.
केंद्र सरकारकडून गरजूंना मोफत धान्यपुरवठा केला जात आहे. जनधन खात्यात प्रत्येकी 500 रुपये, तसेच उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोड मिळालेल्या लाभार्थींना मोफत सिलिंडर दिला जात असल्याचेही पाचपुते म्हणाले.

कुकडीच्या पाण्यासाठी पाठपुवा
दरम्यान, "कुकडी'च्या पाण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत पाचपुते म्हणाले, की अडचणी बऱ्याच असताना, श्रीगोंद्याच्या हद्दीत "कुकडी'चे पाणी आठ दिवस उशिरा मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे अधिकारी-कर्मचारी नसल्याने खालील भागात पाण्याचा वापर थोडा जास्त झाला. अशा वेळी सर्वांना पाणी कसे देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांनी भरणे करण्याचा प्रयत्न आहे. त्यात यशही मिळेल. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com