पश्चिम महाराष्ट्रात कोरोना कमी होईना; अभ्यासासाठी तज्ञांच्या पथकाची गरज...

केंद्र व राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी लॉकडाऊन लावला. यामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तरीही राज्य शासनाने आर्थिक बजेट कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च केले.
पश्चिम महाराष्ट्रात कोरोना कमी होईना; अभ्यासासाठी तज्ञांच्या पथकाची गरज...
Corona infection persists in western Maharashtra; Need a team of experts for the study ...

सातारा : गेली दीड-दोन वर्षे आपण कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शासनही आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. ही संख्या का कमी होत नाही, याचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी एक तज्ञांचे पथक तयार करणे गरजेचे आहे. तज्ञांकडून तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज  आहे. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. Corona infection persists in western Maharashtra; Need a team of experts for the study ...

साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बाल कोविड अतिदक्षता विभागाचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पद्मश्री लक्ष्मण माने, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पुण्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी लॉकडाऊन लावला. यामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तरीही राज्य शासनाने आर्थिक बजेट कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च केले. पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. ही संख्या का कमी होत नाही, याचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी एक तज्ञ लोकांचे पथक तयार करावे. कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, पोलिस तसेच आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले. यापुढेही अशा पद्धतीने चांगले काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लहान मुले उपचारापासून वंचित राहणार नाहीत, याची जिल्ह्यात तयारी करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाने निर्बंधामधून शिथिलता दिली आहे. यामुळे अधिकची काळजी घेतली पाहिजे. कोणालाही कोरोनाची लक्षण आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले. बाल कोविड अतिदक्षता विभागास मदत करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.