कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला; पोलिसांचा लाठीचार्ज..

अजित पवार यांनी शुक्रवारी कोव्हिड उपाय योजना व खरीप हंगामाचा आढावा घेतला.यानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करावे यासाठी त्यांचा ताफा आडविला.
Beed police Lathi charge News
Beed police Lathi charge News

बीड : कोव्हिड उपाय योजना व खरीप हंगामाचा आढावा बैठक आटोपून निघालेल्या 
उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडविला. (Contract health workers block Ajit Pawar's convoy; Police baton charge) सेवेत कायम  करण्याची मागणीसाठी हा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत  लाठीचार्जही केला. आंदोलन, गोंधळाने नगर रोड गजबजून गेला. पवार गुरुवारी कोव्हिड उपाय योजना व खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी जिल्ह्यात 
आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्हा आज खऱ्या अर्थाने गाजला तो कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे. (Deputy Chief Minister Ajit Pawar) आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.

तत्पुर्वी या कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देण्याची मागणी केली. मात्र, त्यांचे नाव नसल्याने त्यांना सोडले नाही. (Health Minister Rajesh Tope) त्यामुळे सर्व कर्मचारी पवार परतणार असलेल्या रस्त्यावर थांबले. पवारांसह इतर मंत्री बैठक आटोपून विश्रामगृहाकडे जात असतानाच घोळक्याने उभा असलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहनांचा ताफा आडविला. (Gardiuan Minister Dhnanjay Munde) यावेळी पोलिस यंत्रणेचीही मोठी धावपळ उडाली.

मुंडे, क्षीरसागरांकडून समजूत..

वाहनातून उतरुन धनंजय मुंडे यांनीही कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु, कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान, गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनीही लाठीजार्च केला. यामुळे आंदोलक आणखीच संतापले. पोलिसांच्या मारहाणीत महिला कर्मचारीही जखमी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा विश्रामगृहासमोर निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनीही सहभाग नोंदविला.

त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन मागण्या अजित पवार यांच्याकडे पोचविण्याचे आश्वासन दिले. आम्ही लेकरं बाळं घरी सोडून कोरोनात काम केले, हक्का मागत आहोत, अशा भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. 

दरम्यान आढावा बैठकीला आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आमदार संदीप क्षीरसागर, संजय दौंड, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी आदींसह प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in