विधान परिषदेसाठी खटावमधील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

गेली 45 वर्षे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठपणे काम केले आहे. तालुक्यात पक्षाची धुरा जबाबदारीने व यशस्वीपणे त्यांनी पार पाडली आहे. तालुक्यात त्यांचा असणारा मोठा संपर्क व कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ पक्षवाढीला कायमच फायदेशीर ठरली आहे. तालुक्यातील अनेक राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी स्वतंत्रपणे अबाधित ठेवला आहे.
Congress workers in Khatav are aggressive for the Legislative Council
Congress workers in Khatav are aggressive for the Legislative Council

वडूज (ता. खटाव) : काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून तालुक्यात पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशिल असणाऱ्या वडूज बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांना काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खटाव तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते  भेटून आग्रही मागणी करणार आहेत.

खटाव तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वडुज येथे आज बैठक झाली. त्यावेळी ही मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव,  तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, ॲड. बाबासाहेब शिंदे, युवकचे तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, बाजार समितीचे संचालक दिलीप घार्गे, माजी सरपंच अर्जुन गोडसे, रणजितसिंह देशमुख, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत काटकर, दिपक गोडसे, ॲड. संतोष भोसले, अनिल कचरे, जैनुद्दीन उर्फ मुन्ना मुल्ला, नितीन गोडसे, प्रकाश गोडसे, फयाज मुलाणी, विक्रम गोडसे, आदी उपस्थित होते.

श्री. गोडसे यांनी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षे भूमिका बजावली आहे. खटाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, राज्य विज मंडळाच्या जिल्हा कमिटीचे सदस्य, जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अशा अनेक पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. शिवाय तालुक्यांत अनेक ग्रामपंचायतीवर कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व ठेवण्यात यश मिळविले आहे.

गेली 45 वर्षे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठपणे काम केले आहे. तालुक्यात पक्षाची धुरा जबाबदारीने व यशस्वीपणे त्यांनी पार पाडली आहे. तालुक्यात त्यांचा असणारा मोठा संपर्क व कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ पक्षवाढीला कायमच फायदेशीर ठरली आहे. तालुक्यातील अनेक राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी स्वतंत्रपणे अबाधित ठेवला आहे. 

तालुक्यातील राजकीय स्थित्यंतरातही विचलीत न होता अशोकराव गोडसे यांनी कायमच पक्षाशी एकनिष्ठ भूमिका ठेवली आहे. अशोकराव आबा यांनी पक्षाशी ठेवलेला एकनिष्ठपणा पक्षश्रेष्ठींनी विचारात घेऊन व त्यांच्या आजवरच्या सामाजिक, राजकीय त्यागाचा विचार करून पक्षाने त्यांना विधान परिषदेची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com