आम्हाला `वोट कटवा`, म्हणणाऱ्या काॅंग्रेसने स्वतःची लायकी तपासावी..

मुळात तेजस्वी यादव यांनी काॅंग्रेसला सत्तर जागा दिल्याच कशा? काॅंग्रेसची तेवढी लायकी अजिबात नव्हती. या ऐवजी तेजस्वी यांनी काॅंग्रेसला २०-२५ जागा देऊन बाकी ठिकाणी आपले उमेदवार दिले असते तर आज बिहारमध्ये त्यांची सत्ता आली असती, असा टोलाही इम्तियाज यांनी लगावला.
mp imtiaz jalil news aurangabad
mp imtiaz jalil news aurangabad

औरंगाबाद ः  बिहार निवडणुकीत एमआयएममुळे आमचे उमेदवार पडले, ही वोट कटवा पार्टी आहे, असा आरोप आमच्यावर केला जातो. देशाती सगळ्यात जुना आणि सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या काॅंग्रेस पक्षाने अशा प्रकारचे आरोप करणे त्यांना शोभत नाही. मुस्लीम मतदार त्यांच्यापासून लांब का गेला? याचा विचार आणि आत्मपरीक्षण काॅंग्रेसने केले पाहिजे. आम्हाला वोट कटवा पार्टी म्हणण्या आधी काॅंग्रेसने आधी आपली लायकी तपासावी, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

बिहार विधानसभा निवडणुकीत २० जागा लढवून पाच ठिकाणी वियज मिळवणाऱ्या एमआयएमच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मात्र काॅंग्रेसने एमआयएमवर मत खाल्ल्याचा आरोप करत पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले आहे. काॅंग्रेसच्या या आरोपाला इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

इम्तियाज जलील म्हणाले, केवळ निवडणुकी पुरते आम्ही सीमांचलमध्ये गेलो नाही, तर गेल्या वेळी पोटनिवडणुकीत एका जागेवर विजय मिळाल्यानंतरही आम्ही येथील जनतेच्या सुखः दुःखात सहभागी झालो होतो. अन्नधान्या प्रमाणेच हैदराबादहून डाॅक्टरांचे पथक पाठवून त्यांच्या आरोग्याची काळजी देखील आम्ही घेतली. असदुद्दीन ओवेसी हे कायम सीमांचल भागातील लोकांच्या संपर्कात होते. वेळोवेळी त्यांना मदत केली, त्यांची काळजी वाहिली त्याचाच हा परिणाम आहे की, आज आम्हाला पाच जागांवर विजय मिळाला. आमची आणखी एक जागा आली असती पण तिथे थोडक्यात पराभव झाला.

काॅंग्रेसकडून आमच्यामुळे त्यांचे उमेदवार पडले हा आरोप म्हणजे आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रकार आहे. मुळात तेजस्वी यादव यांनी काॅंग्रेसला सत्तर जागा दिल्याच कशा? काॅंग्रेसची तेवढी लायकी अजिबात नव्हती. या ऐवजी तेजस्वी यांनी काॅंग्रेसला २०-२५ जागा देऊन बाकी ठिकाणी आपले उमेदवार दिले असते तर आज बिहारमध्ये त्यांची सत्ता आली असती, असा टोलाही इम्तियाज यांनी लगावला.

आपल्यावर ही वेळ का आली? याचा विचार काॅंग्रेसने आता तरी करायला हवा. देशाच्या इतिहास काॅंग्रेसला आतापर्यंत जे यश मिळाले होते, त्यामध्ये मुस्लिमांचा मोठा वाटा होता. पण या पक्षाने मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला. आता लोकांना हे चांगले लक्षात आले आहे, त्यामुळे मतदारांनी काॅंग्रेसचा नाद सोडत एमआयएमला साध दिली आहे. काॅंग्रेसने आमच्या नावाने ओरड करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही इम्तियाज जलील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com