दहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..
Soniya-priyanka Gadhi Congratulate Puskraj Satav News Aurangabad

दहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..

रोज चार ते पाच तास सातत्याने अभ्यास केल्यामुळे एवढे गुण मिळाल्याचे पुष्कराज म्हणाला.

औरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे कौतुक खुद्द काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांनी केले आहे. (Congratulations from Sonia, Priyanka Gandhi of Pushkaraj Satav who passed)  व्हाॅटसअॅप मेसजकरून त्यांनी पुष्कराज त्याची आई प्रज्ञा सातव यांचे खास अभिनंदन केले आहे. पुष्कराज याने मिळवलेल्या यशाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो असे सोनिया व प्रियंका गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनाने सातव कुटुंबियांवर व त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. (Puskaraj Satav Son Of let Congress leader Rajiv Satav.) सातव यांच्या निधनानंतर काॅंग्रेस नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तेव्हा ते भावूक झाले होते. राजीव सातव यांच्या संपुर्ण कुटुंबाशी गांधी परिवार आणि संपुर्ण काॅंग्रेस खंबीरपणे उभी राहील असा विश्वास देखील त्यांनी दिला होता.

राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज हा दहावीमध्ये होता. नुकताच निकाल जाहीर झाला, तेव्हा त्याला ९८.३३ टक्के मार्क मिळाल्याचे  स्पष्ट झाले. सातव यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच पुष्करच्या निकाला निमित्ताने सातव कुटुंबामध्ये आनंदाचा क्षण आला. या यशाबद्दलच्या भावना प्रसार माध्यमांकडे व्यक्त करतांना पुष्कराज याने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबा माझे मित्र म्हणून माझ्याशी बोलायचे, अभ्यासाचा लोड घेऊ नको, असे आवर्जून सांगायचे.

आज ते असते तर त्यांना अधिक आनंद झाला असता. कोरोनामुळे आॅनलाईन क्लासेस सुरू होते, पण मी अभ्यासाचे जे नियमित शेड्यूल तयार केले होते ते कायम ठेवले, त्यात खंड पडू दिला नाही. रोज चार ते पाच तास सातत्याने अभ्यास केल्यामुळे एवढे गुण मिळाल्याचे पुष्कराज म्हणाला. भविष्यात वाणिज्य क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे असल्याचे त्याने सांगितले. पुष्कराज याच्या आई प्रज्ञा यांनी देखील या निमिताने सातव यांना किती आनंद झाला असता हे सांगितले.

राजीवजींचे स्वप्न पुर्ण करणार..

सातव हे राजकारणात असल्यामुळे सातत्याने दौऱ्यावर असायचे. त्यामुळे पुष्कराजचा अभ्यास अगदी नर्सरीपासून मीच घ्यायचे, तो अभ्यासाच्या बाबतीत किती जागृक आहे, हे साहेबांना माहित होते, त्यामुळे ते मला अनेकदा त्याला अभ्यासाचा जास्त ताण देऊ नको, असे सांगयाचे. भविष्यात पुढे काय करायचे याचे पुर्ण स्वातंत्र्य आम्ही पुष्कराज याला दिले आहे.

राजीवजी  आज हयात नसले तरी त्यांना पुष्कराजला जसे घडवायचे होते, ज्या जागेवर पहायचे होते, ते स्वप्न पुर्ण करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही, त्याला वडिल नसल्याची उणीव भासू देणार नाही, असेही प्रज्ञा सातव यांनी सांगितले. भविष्यात राजीव सातव यांचे अपुर्ण राहिलेले काम, हिंगोलीवासियांची सेवा, त्यांनी कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे, पुष्कराज याने पुढे कायम ठेवावे आणि त्याचा वारसा चालवावा, अशी आपली इच्छा असल्याचेही प्रज्ञा म्हणाल्या. परंतु शिक्षणाची सात-आठ वर्ष पुर्ण झाल्यानंतर या संदर्भात विचार केला जाईल.

सोनिया, प्रियंका मॅडमचा मेसेज..

राजीव सातव यांच्या कुटुंबाबद्दल गांधी घराण्याला खूप आपुलकी आहे, सातव यांच्या जाण्यानंतर या कुटुंबाची काळजी काॅंग्रेस पक्ष आणि विशेषतः राहूल आणि प्रियंका गांधी वाहत आहेत. पुष्कराज दहावीत उतीर्ण झाल्याचे समजताच सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी व्हाॅटसअॅपवरून मेसेज पाठवला असून त्यांनी पुष्कराज व माझेही अभिनंदन केले असल्याचे प्रज्ञा यांनी आवर्जून सांगितले. 

Edited By :

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.