भंडाऱ्याचे कलेक्टर समस्या जाणून घेण्यासाठी बुलेटवरून आले गावात..

जिल्हाधिकारी कदम नुकतेच आवळी गावात आले होते. विशेष म्हणजे ते एका कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर गावात आले होते.
Bhandara Collector Visit Village on Bike news
Bhandara Collector Visit Village on Bike news

भंडारा ः उच्चपदस्थ अधिकारी जेव्हा बडेजाव न करता सर्वसामान्यांप्रमाणे वागतात तेव्हा त्याची चर्चा होतेच. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवळी गावातील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम चक्क दुचाकीवरून आले. (Collector of Bhandara to the village on a two-wheeler for inspection.) त्यांचा हा साधेपणा पाहून ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.

एंकर-वैनगंगा व चुलबंद नदीच्या वेढ्यात वसलेल्या आवळी गावात पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होतात. पूरामुळे गावातील लोकांची अनेकदा दैना होते. या व इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कदम नुकतेच आवळी गावात आले होते. विशेष म्हणजे ते एका कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर गावात आले आणि त्यांनी परिस्थितीची आढावा घेतला.

चुलबंद व वैनगंगा नदीचा वेढा असलेल्या तालुक्यातील आवळी गावाला नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातून दोंग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. (The village of Awli in the taluka, which is surrounded by Chulband and Wainganga rivers, is always hit hard by floods.) एवढेच नाही तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य ,शिक्षण यासारख्या मुलभुत सुविधांपासून पावसाळ्यात वंचित राहतात.

यासबंध परिस्थितीवर उपाय योजना ब पावसाळ्यात खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पुर्व तयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी कदम यांनी आवळी गावात भेट दिली. यावेळी जिल्हाधिका-यांनी गावालगतच्या वैनगंगा नदी पात्रासह गावातील प्राथमिक शाळा,पाणी पुरवठा योजना यासह अन्य शासन सुविधांची पाहणी करुन माहिती घेतली.

पुरपरिस्थीतीत या गावातील शेतपिकांची देखील मोठ्या प्रमाणात हानी होते. याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली. जिल्हाधिका-यांनी या गावाला भेट देतांना सोनी व आवळी गावाच्या मधोमध असलेल्या चुलबंद नदीतून पायी व पुढे दुचाकीने जात ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com