पोकळ पॅकेजच्या घोषणा करणारे आमचे सरकार नाही : उद्धव ठाकरे 

सध्या शेती व शिक्षणाचा सिझन सुरू होत असून शाळा सुरू करता येईल का, शिक्षण कसे सुरू ठेवता येईल, यावरही निर्णय घेणार आहोत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये तुमच्या सर्वांची चिंता महाराष्ट सरकारला आहे,, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

सातारा : शहरीसह ग्रामीण भागातील जनता कोरोनाविरोधातील लढ्यात जिद्दीने उतरली आहे. प्रादुर्भाव मर्यादित ठेवला आहे. परदेशातील भारतीय डॉक्‍टरांनी आपल्या कामाची स्तुती केली आहे. आपल्या प्रयत्नांना आलेले यश त्यांनी मान्य केले आहे. आपण सर्व कोरोनाविरोधाती योध्दे आहात. पण काही जण पॅकेज का दिले नाही, असे विचारत आहेत. सुरवातीला जनतेला सुविधा द्यायला हव्यात. आजपर्यंत आम्ही खुप पॅकेजेस वाटलीत आणि बघितलीही. काही पॅकेजेस वरून सर्व छान असते आतमध्ये काही नाही. त्यामुळे अशा पोकळ पॅकेजच्या घोषणा करणारे आमचे महाविकास आघाडीचे सरकार नाही, असे प्रतिउत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या महामारित राज्य शासनाने केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दिली. 

उध्दव ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागात खुप जिद्दीने लढ्यात उतरले आहेत. विशेष मराठवाडा, विदर्भ आहे. मालेगाव अटोक्‍यात येत आहे. ग्रामीण भागातील लोकांनी आजही कोविड प्रादुर्भाव अतिशय जिद्दीने मर्यादित ठेवला आहे. परदेशातील भारतीय डॉक्‍टरांनी आपली स्तुती केली आहे. आपल्या प्रयत्नांना आलेले यश त्यांनी मान्य केले आहे. आपण सर्व कोरोना योध्दे आहात.

पण काहीजण राज्याने पॅकेज का जाहिर केलेले नाही, असे विचारत आहेत. महामारीच्या काळात जनतेला सुविधा द्यायला हव्यात. आजपर्यंत खुप पॅकेजेस वाटलीत आणि बघितलीतही वरती सर्व छान पॅकेज असते आतमध्ये काही नाही. अशा पोकळ घोषणा करणारे आपले महाविकास आघाडीचे सरकार नाही. शिवभोजन योजना पॅकेज पलिकडची असून पाच रूपयात लाखांवर थाळी देत आहोत. यासाठी कुठलेही पॅकेज नाही.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून शंभर टक्के मोफत उपचार करून देणार आहोत. काय पॅकेज आहे याची जाहिरात करायची की प्रत्यक्ष काम करायचे. राज्यातील मजूरांना घरी जायचे होते. केंद्राकडे आम्ही रेल्वे मागत होतो. त्यावेळी परवानगी मिळाली नाही. संकट वाढल्यानंतर परवानगी दिली गेली. हे मजूर रस्त्यावरून चालत आपल्या गावी चालले आहेत. आता केंद्राने सोय केल्यानंतर 85 टक्के पैसे मिळतील. आजपर्यंत राज्य सरकारने 481 रेल्वे गाड्या सोडलेल्या आहेत. त्यातून सहा ते सात लाख मजूरांची सोय केली आहे.

राज्य सरकारने जवळ 85 कोटी रूपये रेल्वे भाड्यापोट खर्च केले आहेत. हे पॅकेज आहे का, असा प्रश्‍न करून श्री. ठाकरे म्हणाले, रोज 80 रेल्वे गाड्याची आम्ही केंद्राकडे मागणी करत आहे. मिळतात केवळ 30 ते 40 रेल्वे गाड्या. महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या मजूरांची नोंदणी करून त्यांची आम्ही चांगली सोय करतोय. ते जाताना महाराष्ट्र सरकारचा जयजयकार करत आपल्या घरी जात आहेत. त्यांचे तिकिट ही घेतलेले नाही. यासाठी आम्ही केंद्राच्या मदतीची वाट न पाहाता आमची आम्हीच मदत केली आहे. 

एसटीला धन्यवाद देताना श्री. ठाकरे म्हणाले त्यांनी रस्त्याने चालत जाणाऱ्यांना घरी सोडले आहे. परराज्यात आणि जिल्ह्यातही पोहोचवत आहेत. पाच ते 23 मेपर्यंत एसटीच्या 32 हजार फेऱ्या झाल्या असून त्यातून तीन लाख 80 हजार मजूरांना त्यांच्या ठिकाणांपर्यंत पोचविले आहे. त्यासाठी 75 कोटी रूपये खर्च केला आहे. त्यासाठी कुठले पॅकेज पाहिजे तुम्हाला, असा प्रश्‍न श्री. ठाकरे यांनी उपस्थित केला.

हवाई मार्गे आपले बाहेरच्या राज्यात अडकलेले विद्यार्थी व लोक येत आहेत. सात जूनपर्यंत 13 विमानांनी लोक महाराष्ट्रात येणार आहेत. नागरी उड्डाणमंत्र्यांशी माझे बोलणे झाले आहे. आता आम्हाला सर्व काही सुरू करायचे आहे, वाढवायचे आहे, त्यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. सध्या शेती व शिक्षणाचा सिझन सुरू होत असून शाळा सुरू करता येईल का, शिक्षण कसे सुरू ठेवता येईल, यावरही निर्णय घेणार आहोत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये तुमच्या सर्वांची चिंता महाराष्ट सरकारला आहे, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com