मुख्यमंत्र्यांनी राणेंना भाषणातूनच उत्तर द्यायला हवे होते, कारवाई चुकीची...
Ramdas Athavale - Uddhav Thackeray

मुख्यमंत्र्यांनी राणेंना भाषणातूनच उत्तर द्यायला हवे होते, कारवाई चुकीची...

यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असे व्यक्तव्य केले आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, त्यांना कुठे पोलिसांनी पकडले दाखवा, असे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवे होते.

नागपूर : नारायण राणेंच्या Union Minister Narayan Rane अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची भाषा ही शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे राणेंना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच द्यायचे होते. पण तसे न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले Ramdas Athavale यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असे व्यक्तव्य केले आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, त्यांना कुठे पोलिसांनी पकडले दाखवा, असे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवे होते. पण पोलिसांकरवी केलेली कारवाई चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. अटक करण्याला राणेंनी काही गुन्हा केलेला नाही, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री केले. त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने लोकांना मदत करणे गरजेचे होते. पावसाळ्यात दरडी कोसळून नुकसान झालेल्यांनाही मदत करणे अपेक्षित होते. पण या कामात राज्य सरकार अपयशी ठरले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जनतेला न्याय देण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. अशा मुख्यमंत्र्याचा सत्तेवर राहून उपयोग काय, असे नारायण राणेंना वाटले असावे. त्यामुळे अपयशी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत राणेंनी शिवसेनेच्याच भाषेत वक्तव्य केले होते, असे आठवले म्हणाले. 

एकनाथ शिंदे भाजपमध्ये येतील, अशी भूमिका राणेंनी मांडली होती. शिवसेनेत अनेक आमदार नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेने आजपर्यंत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सामना केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना ‘सामना’ या वृत्तपत्रातून ते शिवसेनेची भूमिका वेळोवेळी मांडत होते. पण यांनी आता कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी केल्याने शिवसेनेत मंत्री, आमदारांसह अनेक जण नाराज आहेत आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे आठवले म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.