शशीकांत शिंदेंसाठी राष्ट्रवादी, भाजपकडून चक्रव्यूह; ताकत डळमळीत करण्याचा प्रयत्न

बँक आणि प्रतापगड कारखाना मैदानातून आमदार शिंदेंचे वर्चस्व संपवण्यासाठी हालचाली चालू असल्याचे सध्या दिसत आहे. ऐनवेळी ज्ञानदेव रांजणे आणि सौरभ शिंदे यांच्या प्रवेशावरून अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळू लागली आहेत.
शशीकांत शिंदेंसाठी राष्ट्रवादी, भाजपकडून चक्रव्यूह; ताकत डळमळीत करण्याचा प्रयत्न
Chakravyuh from NCP, BJP for Shashikant Shinde; Trying to shake strength

भिलार : आमदार शशिकांत शिंदे यांची राजकीय नौका सध्या चक्रव्यूहात आहे. मुंबईच्या मैदानात माथाडी नेते नरेंद्र पाटील, कोरेगावच्या आखाड्यात आमदार महेश शिंदे, जावळीच्या रणांगणात कारखाना व आमदार गट, तर बँकेच्या सारीपाटावर अध्यक्षपदासाठी स्वतः इच्छुक असल्याने वेगळा गट आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीतील नाराज आणि दुसरीकडे भाजप अशा जबरदस्त विरोधामुळे शिंदे यांची राजकीय ताकद डळमळीत करण्याची व्यूहरचना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असल्याचे चित्र आहे. Chakravyuh from NCP, BJP for Shashikant Shinde; Trying to shake strength

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 'टार्गेट जावळी' हे सत्र सुरू झाल्याचे दिसते. राजपुरीत बुधवारी झालेल्या भेटींतून हे स्पष्ट होते. सोसायटी मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली निवड पक्की करत आणली असतानाच त्यांना एका बाजूने ज्ञानदेव रांजणे आणि दुसऱ्या बाजूने कारखाना गटाचे सौरभ शिंदे यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांना खिंडीत गाठून त्यांचा राजकीय गेम करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या दिसतात. 

दुसऱ्या बाजूने 'प्रतापगड कारखाना' ही जावळीची आस्मिता टिकवण्यासाठी अनेक युक्त्या झाल्या; परंतु कोरेगाव आणि साताऱ्याच्या चढाओढीत वाईच्या 'किसन वीर'ने संधी साधली. आता पुन्हा एकदा हा प्रश्‍न ऐरणीवर आला अहे. जावळी तालुक्याचे अर्थचक्र गतिमान व्हावे यासाठी प्रतापगडची उभारणी झाली. उसाचे क्षेत्रही तालुक्यात वाढू लागले; परंतु कारखान्याची होरपळ आणि तालुक्यातील सत्तासंघर्ष या अर्थचक्राच्या आड येऊ लागला. शह- काटशहाच्या राजकारणात ऊस उत्पादक वाऱ्यावर पडला आणि अनेक उत्पादकांनी आपला ऊस अक्षरशः डोळ्यादेखत स्वतःच्या शेतात पेटवून दिला.

प्रतापगड कारखाना चांगल्या रीतीने चालला, तर येथील ऊस उत्पादक सैरभैर फिरणार नाही. त्यासाठी आता सर्वांच्या नजरा 'प्रतापगड' सर करण्याकडे लागल्या असल्याचे चित्र आहे. कालची राजपुरी भेट खासगी असली, तरी त्यातील मान्यवरांची उपस्थिती पाहता आगामी निवडणुकीचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील बँकेच्या राजकारणाची बांधणी तर नाही ना अशा शंका कुशंका सध्या ऐकायला मिळत आहेत. बँक आणि प्रतापगड कारखाना मैदानातून आमदार शिंदेंचे वर्चस्व संपवण्यासाठी हालचाली चालू असल्याचे सध्या दिसत आहे. ऐनवेळी ज्ञानदेव रांजणे आणि सौरभ शिंदे यांच्या प्रवेशावरून अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळू लागली आहेत. 

या भेटीबाबत खुद्द राजेंद्रशेठ राजपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘आम्ही सर्व जण एका कार्यक्रमानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात आलो होतो. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती’, असे सांगितले असले तरी सध्याचे निवडणुकीचे वारे आणि फोटोतील मान्यवरांची उपस्थिती सर्व काही सांगून जाते. जावळीच्या आस्मितेचे भवितव्य सध्या बँक निवडणुकीच्या चक्रात अडकून उजळायला हवं; अन्यथा राजकारण्यांचा सत्तासंघषार्यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक रसातळाला जावून त्याचा ‘दूध संघ’ होवू नये, हीच अपेक्षा जावळीकरांच्यातून व्यक्त होत आहे. 

आमदार शशिकांत शिंदे यांची राजकीय नौका सध्या चक्रव्यूहात दिसते. मुंबईच्या मैदानात माथाडी नेते नरेंद्र पाटील, कोरेगावच्या आखाड्यात आमदार महेश शिंदे, जावळीच्या रणांगणात कारखाना व आमदार गट, तर बँकेच्या सारीपाटावर अध्यक्षपदासाठी स्वतः इच्छुक असल्याने वेगळा गट आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीतील नाराज आणि दुसरीकडे भाजप अशा जबरदस्त विरोधामुळे शिंदे यांची राजकीय ताकद डळमळीत करण्याची व्यूहरचना बँकेच्या निमित्ताने सुरू असल्याचे दिसते. 
 

Related Stories

No stories found.