साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाउन : पालकमंत्र्यांनी दिले संकेत

रूग्ण संख्या कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही आज बैठक घेऊन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काही सूचना केल्या आहेत. ते आता सातारा जिल्ह्यासह शहराचा आढावा घेऊन सायंकाळपर्यंत लॉकडाउनची नवी नियमावली जारी करतील, असे त्यांनी सांगितले.
साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाउन : पालकमंत्र्यांनी दिले संकेत
The chain of corona is not broken in Satara; The Guardian Minister signaled a strict lockdown

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आहोरात्र झटत आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची ही भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात लॉकडाउनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत. त्याची नियमावली आज सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून जाहीर केली जाईल, अशी माहिती सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.  

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज अडीच हजारांनी वाढत आहे. लॉकडाउन असूनही लोक बाहेर पडत असून सकाळी अकरापर्यंत नागरीकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातूनच संसर्ग वाढत आहे. काही कुटुंबेच कोरोनाबाधित होत असल्याने बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शासकिय विश्रामगृहात खासदार व आमदारांसह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल, आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये तसेच अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. तसेच आमदार व खासदारांनी काही सूचना केल्या. बैठकीनंतर पालकमंत्र्यांशी पत्रकारांनी संवाद साधला. बाळासाहेब पाटील म्हणाले, लॉकडाउन सुरू असतानाही काही जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. सातारा जिल्ह्यातही रूग्ण
संख्या वाढली आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता काशीळसह आणखी दोन ठिकाणी आम्ही कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन करत आहोत.

यंत्रणा उपलब्ध होत असली तरी रूग्ण संख्या कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही आज बैठक घेऊन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काही सूचना केल्या आहेत. ते आता सातारा जिल्ह्यासह शहराचा आढावा घेऊन सायंकाळपर्यंत लॉकडाउनची नवी नियमावली जारी करतील, असे त्यांनी सांगितले. 
 

Related Stories

No stories found.