बविआ शिवसेना एकत्र? सेनेतून मात्र काहींचा विरोध 

विरारमधील काही पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावला कडाडून विरोध केला असून ज्यांच्या विरोधात आम्ही इतकी वर्षे लढलो त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नसल्याचे सांगितल्याचे समजते.
BVA Shivsena together? Opposition from some in the army
BVA Shivsena together? Opposition from some in the army

विरार : राज्यात आणि वसई विरारमध्येही कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्याने पुन्हा एकदा रखडलेल्या पालिका निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी त्यासाठीची मोर्चे बांधणी सुरु केली आहे. हे करत असतानाच गेल्या आठवड्यात खासदार राजेंद्र गावित MP Rajendra Gavit यांनी पालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर सेनेच्या पदाधिकाऱ्या बरोबर बैठक घेतली होती. त्यावेळी निवडणुकीबाबत या बैठकीत बविआ बरोबर युती करण्याची चर्चा झाल्याचे समजते. त्यावेळी काही कट्टर शिवसैनिकांनी मात्र, याला विरोध केला आहे. याबाबत शिवसेनेच्या गोटातून मात्र असे काही झालेच नाही असे सांगण्यात येत आहे. BVA Shivsena together? Opposition from some in the army

कोरोनाचा आणि पावसाळी कामाबाबत आढावा घेण्यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालिकेमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर चहा पाण्याच्या कार्यक्रमावेळी येणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. त्यात काही शिवसैनिकांनी युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तर काही कट्टर शिवसैनिकांनी त्याला विरोध दर्शविल्याचे पुढे आले आहे. 

विरारमधील काही पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावला कडाडून विरोध केला असून ज्यांच्या विरोधात आम्ही इतकी वर्षे लढलो त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नसल्याचे सांगितल्याचे समजते. या बैठकीत खासदारांनीही अशी युती होऊ शकत नसल्याचे सांगितल्याचे सांगण्यात येते. याठिकाणी युती बाबतचा निर्णय मात्र जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र फाटक यांच्या अहवालावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याने आता तरी बविआ आणि शिवसेनेच्या युती बाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले . 

अशी कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच कुणाशी युती करण्यासंबंधी चर्चा झालेली नाही. बहुजनला टक्कर देणारा वसईत शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. राजकीय भवितव्यासाठी कुणाशीही युती न करता स्वतंत्र लढणे शिवसेनेच्या हिताचे आहे  
          
- राजेंद्र गावित (खासदार, पालघर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in