सांड, बैल अन् रावसाहेब दानवे..

खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे आणि वर माझी भाषाच अशीच आहे, शेतकऱ्यांना समजले या भाषेत मी उदाहरण दिले असे म्हणत समर्थन करणे योग्य नाही.
सांड, बैल अन् रावसाहेब दानवे..
Railway state Minister Raosaheb Danve news Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तब्बल एक महिना दहा दिवसांनी मतदारसंघात परतलेले रावसाहेब दानवे चांगलेच उत्साहात होते. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने ठिकठिकाणी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या ग्रामीण ढंगाने रंगतही आणली. (Bulls and Raosaheb Danve) पण अतिउत्साहाच्या भरात बदनापूर येथील भाषणात त्यांनी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना थेट सांडाशी करून टाकली. 

बरं एवढ्यावरच थांबतील ते दानवे कसले, तर आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असे स्पष्टीकरण देतांना त्यांनी आणखी एक चूक केली. काम न करणारा बैल सांड आणि काम करणारा बैल असे आपल्याला म्हणावयाचे होते, अशी सावरासावर दानवे यांनी केली. ( Central State Railway Minister Raosaheb Danve)  पण यातून आपण अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना बैलाशी तर करत नाही ना? याचे भान देखील त्यांना राहिले नाही. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात सांड, बैल आणि रावसाहेब दानवे यांची चर्चा चांगलीच सुरू आहे. 

रावाहेब दानवे यांना आपली रांगडी भाषा, ग्रामीण पेहराव आणि सर्वसमान्यांमध्ये मिसळून साधेपणाने वागणे याचा प्रचंड अभिमान आहे. (Congress Leader Rahul Gandhi) तो आपल्या भाषणातून ते नेहमी बोलूनही दाखवतात. माझ्यावर तुम्ही सगळे प्रेम करतात ते माझ्या या स्वभावामुळेच असा दावाही ते करतात. गेल्या ३५-४० वर्षात सातत्याने ४० निवडणुका आपण जिंकलो, एकदाही पराभूत झालो नाही, याचे कारण आपण सामान्यांमध्ये रमणारे आहोत म्हणून असेही दानवे आनंदाने सांगतात.

मोदी सरकाच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात नव्या ४० मंत्र्यांचा समोवश करण्यात आला. तो करत असतांना जुन्या मंत्रीमंडळातील १२ जणांना नारळही देण्यात आला. पण या बाराजणांमध्ये आपले नाव येणार नाही याची खरबदारी तर दानवे यांनी घेतली, पण रेल्वे, कोळसा आणि खाण हे महत्वाचे खातेही मिळवले. पडझडीत देखील दानवे यांनी आपले स्थान टिकवून ठेवले आणि रेल्वे मंत्रालयाचा कारभार स्वीकारत काही महत्वाचे निर्णय घेत धडाकेबाज कामाला सुरूवातही केली. 

दानवे एक्स्प्रेस घसरली..

पंतप्रधान मोदी यांच्या आदेशामुळे दानवे यांच्यासह सगळेच नवनिर्वाचित मंत्री, खासदार अधिवेशन असल्यामुळे दिल्लीतच होते. अधिवेशन संपल्यानंतर नव्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघात जाऊन जनतेचे आशिर्वाद घ्या, असे आदेशही दिले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघातून यात्रा काढली. ही यात्रा जालना आणि औरंगाबादेत आली तेव्हा रावसाहेब दानवे देखील त्यात सहभागी झाले. बदनापूर येथे दानवे-कराड यांच्या सत्काराचे आमदार नारायण कूचे यांनी आयोजन केले होते. 

रावसाहेब दानवे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात या मतदारसंघाने कायम त्यांना भक्कम साथ दिलेली आहे. याचा उल्लेख आपल्या भाषणात करतांनाच दानवे यांनी उपस्थितांसमोर आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतांना त्यांनी काॅंग्रेसकडून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याच्या मागणीची खिल्लीही उडवली. विरोधक म्हणून त्यांनी ती उडवणे सहाजिकच आहे, पण ती उडवतांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे आणि वर माझी भाषाच अशीच आहे, शेतकऱ्यांना समजले या भाषेत मी उदाहरण दिले असे म्हणत समर्थन करणे योग्य नाही.

राहूल गांधी यांची मोकाट फिरणारा सांड, काम न करता गावभर शेतात चरणारा, कुठल्याचा कामाला न येणारा अशी अनेक विशेषणं दानवे यांनी राहुल गांधी यांच्या बाबतीत वापरली. समोर बसलेल्या हजार पाचशे दानवे समर्थकांनी यावर टाळ्या देखीव वाजवल्या. पण एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याची तुलना बैल, किंवा साडांशी करणे कुणालाच पटले नाही. काॅंग्रेसने दानवे यांच्या या वक्तव्याचा निषेध करत निदर्शनेही केली. सांड प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच दानवे यांनी याचे खापर देखील मिडियावरच फोडले. 

मिडियावर खापर..

माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. शेतकऱ्यांना कळेल त्या भाषेत मी बोललो, असे सांगतानां त्यांनी दुसरी चूक केली. राहुल गांधी म्हणजे काम न करणारा बैल, तर पंतप्रधान हे काम करतात असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी यांची तुलना देखील बैलाशीच केली. काम करणाऱ्या व्यक्तीची तुलना करण्यासाठी दानवे यांना दुसरे उदाहरण सापडू नये याचे आश्चर्य वाटते. राहुल गांधींना सांड संबोधल्यावर काॅंग्रेसने संताप व्यक्त करत निदर्शने केली. पण मोदींची तुलना बैलाशी केल्यानंतर आता भाजपकडून याचे समर्थन कसे केले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.