दोन अधिकाऱ्यांचे पंख छाटले ! पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांचा पहिला दणका
Pimpri.png

दोन अधिकाऱ्यांचे पंख छाटले ! पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांचा पहिला दणका

अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांवर पालिका सभेत मंगळवारी आरोप झाले आणि बुधवारी आयुक्तांनी या दोघांचेही वित्तीय अधिकार काढून घेत त्यांचे पंखच छाटले.

पिंपरी : अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांवर पालिका सभेत मंगळवारी आरोप झाले आणि बुधवारी आयुक्तांनी या दोघांचेही वित्तीय अधिकार काढून घेत त्यांचे पंखच छाटले.

हे निविदाविषयक अधिकार नवीन आयुक्त राजेश पाटील यांनी नव्यानेच आलेले दुसरे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सोपविले. याव्दारे पहिला दणका देत पाटील यांची पिंपरीत पाटीलकी सुरु केल्याची चर्चा पालिकेत आज ऐकायला मिळाली.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे तत्कालीन आरोग्य व वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राय यांनी बॅंक खात्यावर लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडील आर्थिक अधिकार त्यावेळचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढून घेत ते पवार यांच्याकडे सोपविले होते.

आता ते व त्यांच्याक़डील इतरही वित्तीय अधिकार नवे आयुक्त पाटील यांनी काढून ते  ढाकणे यांच्याकडे सोपवले आहेत.मंगळवारी (ता.९) पवार व रॉय यांच्यावर पालिका सभेत गंभीर आरोप झाले होते. कोरोनाच्या एकाही रुग्णावर उपचार न करता भोसरीतील दोन कोरोना सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलला सव्वातीन कोटी रुपयांचे बिल अदा केल्याबद्दल पवार टीकेचे धनी झाले होते. त्याचे पडसाद परवाच्या पालिका सभेतही उमटले. त्यामुळे सभा अध्यक्ष महापौर माई ढोरे यांनी या दोघांचेही अधिकार काढण्याचा आदेश दिला होता. त्यावर २४ तासात आयुक्तांनी अंमल केला.दोघांचेही अधिकार ढाकणे यांच्याकडे त्यांनी दिले आहेत.

पवार आणि रॉय या दोघांना फक्त प्रशासकीय कामकाज पाहण्यास सांगण्यात आले आहे.
 

हेही वाचा..

पिचड यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अकोले : येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेला आकस्मिक लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

झालेली घटना दुर्दैवी असून झालेले नूकसान भरुन काढून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुयात, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,  यादृष्टीने दुर्दैवी घटनेला तोंड देऊन आवश्यक ती मदत उभी करु, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल असेही पिचड या वेळी म्हणाले.

विद्यमान कार्यकारिणीचे काम उत्तमप्रकारे सुरु असून, संकट काळातही ते उभे राहतात. शिक्षणासारख्या पवित्र व चांगल्या कामाच्या पाठीशी परमेश्वर आहे. व्यवस्थेत चांगल्या वाईट चर्चा या होतच असतात, त्याचा विचार न करता चांगले काम सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.