पिंपरी पालिकेतील सत्ता गमावण्याच्या भीतीमुळे भाजपचे आमदार धास्तावले 

त्यामुळे सत्तेशिवाय राहू न शकणा-या भाजप आमदारांना पालिकेतीलही सत्ता जाण्याची भिती सतावत आहे. म्हणून ते अजितदादांवर टिका करून लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आटापीटा करत आहे, असे ते म्हणाले.
पिंपरी पालिकेतील सत्ता गमावण्याच्या भीतीमुळे भाजपचे आमदार धास्तावले 
BJP MLAs panicked for fear of losing power in Pimpri Municipality

पिंपरी : पिंपरी-चिंचवड Pimpari chinchwad महापालिकेतील भ्रष्टाचारी आणि अपारदर्शक कारभारामुळे भाजपला सत्ता गमावण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यांचे धास्तावलेले शहरातील आमदार अजित पवार MLA Ajit Pawar यांना लक्ष्य करीत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील Sanjog Waghere Patil यांनी बुधवारी (ता.२३) केला.  पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सत्ता आमचीच, असा दावा भाजपच्या शहरातील दोन्ही आमदारांनी नुकताच केला. तो खोडताना हा भाजप आमदारांचा फाजील आत्मविश्वास असल्याचे वाघेरे म्हणाले. BJP MLAs panicked for fear of losing power in Pimpri Municipality

भाजपचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांनी 'सरकारनामा'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पिंपरी पालिकेत पुन्हा बहूमताने भाजपच सत्तेत ये्णार असल्याचे सांगितले. तर, आज (ता.२३) शहराचे भाजपचे दुसरे कारभारी भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनीही एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आमदार जगतापांसारखेच वक्तव्य केले. त्याचा लगेचच समाचार घेताना वाघेरे म्हणाले, २०१७ ला केंद्र व राज्यातल्या सत्तेचा दुरुपयोग करून तसेच राष्ट्रवादीवर खोटे आरोप करून भाजपने सत्ता मिळवली. पण, चार वर्षात त्यांचा खरा चेहरा उघड झाला. 

कोणत्याही आश्वासनाची त्यांनी पुर्तता केलेली नाही. उलट त्यांचा भ्रष्टाचारी, अपारदर्शी कारभार शहरवासीयांनी पाहिला.त्यांच्या काळातील स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. कोट्यवधी रुपयांची अवास्तव उधळपट्टी ते करीत आहेत. कच-याच्या निविदेत दोन्ही आमदारांनी शहर कसे वाटून घेतले, हे शहराने पाहिलेले आहे. शहराला मूलभूत गरज असलेला पाणीपुरवठा देखील दररोज करणे त्यांना शक्य झालेले नाही. आमच्या राजवटीत दररोज होणारा पाणीपुरवठा सध्या दिवसाआड होत आहे.

आमच्या काळातच उभारलेली बांधलेली रुग्णालये कोरोना काळात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सध्या उपयोगी पडत आहेत. राजकारण, श्रेयवादाच्या मुद्यावर भाजप निश्चित आघाडीवर असेल, परंतु शहरातील विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी  भाजपपेक्षा कायम आघाडीवर आहे,असा टोलाही वाघेरेंनी लगावला. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पालिकेत सत्ता स्थापन करणार असून भाजपला धडा शिकवण्याची तयारी शहरातील सुज्ञ मतदारांनी केली असल्याचा दावाही त्यांनी केला.

त्यामुळे सत्तेशिवाय राहू न शकणा-या भाजप आमदारांना पालिकेतीलही सत्ता जाण्याची भिती सतावत आहे. म्हणून ते अजितदादांवर टिका करून लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आटापीटा करत आहे, असे ते म्हणाले. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपने अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नांचे भांडवल केले. हा प्रश्न सोडवला म्हणून साखरही वाटली. परंतु, अनधिकृत बांधकामांवरून केवळ राजकारण करण्यापलिकेडे भाजप आणि त्यांच्या आमदारांनी काही केले नाही.शहरातील किती अनधिकृत बांधकामे अधिकृत केली, हे त्यांनी दाखवावे.उलट यांच्या  काळात अनधिकृत बांधकामे वाढली असून हा प्रश्न त्यांनी आणखी किचकट केल्याचा आरोप वाघेरेंनी केला.


 

Related Stories

No stories found.