भाजप नगराध्यक्षाकडून गर्भवतीचा विनयभंग; गुन्हा दाखल
Fir filed against Bjp Activites News Beed

भाजप नगराध्यक्षाकडून गर्भवतीचा विनयभंग; गुन्हा दाखल

गुन्ह्याच्या निषेधार्थ येथील डॉक्टर असोसिएशनने बंद पुकारला असून गुन्हा नोंद झक्यानंतर डॉक्टर हजारी यांच्या दवाखाना परिसरात मोठी गर्दी झाली.

बीड : जिल्ह्यातील किल्लेधारूर शहराचे प्रथम नागरिक व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून धारूरमध्ये मंगळवारी (ता. ३१)  गुन्हा दाखल झाला आहे. (BJP mayor molested a pregnant woman; Filed a crime)

डॉ. स्वरूपसिंह हजारी धारूरचे नगराध्यक्ष आणि भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांचा वैद्यकीय व्यवसाय देखील आहे. (Bjp Dhrur-Beed) मंगळवारी धारूर येथिल रहिवाशी एक महीला उपचारासाठी दवाखान्यात गेली असता विनयभंग केल्याचे पीडितेने धारूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार हजारी यांच्यावर ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fir Field Against Bjp Activites) गुन्ह्याचा तपास केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करत आहेत.  

गुन्ह्याच्या निषेधार्थ येथील डॉक्टर असोसिएशनने बंद पुकारला असून गुन्हा नोंद झक्यानंतर डॉक्टर हजारी यांच्या दवाखाना परिसरात मोठी गर्दी झाली. इतर विविध संघटनांनी देखील बंद पुकारला आहे.

हा गुन्हा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे शहरात मंगळवार सायंकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.