नाना पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे..

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Nana Patole, Chandrakant Patil
Nana Patole, Chandrakant Patilsarkarnama

मुंबई : पटोले आणि भाजप मधील वाद थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष (BJP) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रविवारी (ता.23 जानेवारी) केली आहे. तसेच, पटोलेंच्या वक्तव्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Nana Patole, Chandrakant Patil
...तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता : उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

पाटील म्हणाले, पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आपण याचा निषेध करतो, अश्या शब्दात त्यांनी पटोलेंचा समाचार घेतला.

मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर 'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये, असा इशाराही पाटलांनी दिला आहे.

Nana Patole, Chandrakant Patil
बाळासाहेबांनी रचलेल्या पायामुळेच शिवसेनेला सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली!

दरम्यान, पटोले यांच्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत असून पोलिस खातेही सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे. पंतप्रधानांबाबत पटोले यांनी जे वक्तव्य केले, ते शेंबड्या पोरालाही ऐकविले तरी ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल आहे, असे तो सांगेल. सतत खोटे बोलणे आणि फसवणूक करणे हा नानांचा स्वभाव आहे. म्हणून मी त्यांना मिस्टर नटवरलाल म्हणणार आहे आणि महाराष्ट्रसुद्धा त्यांना याच नावाने ओळखेल. जो गावगुंड म्हणून पटोले यांनी पत्रकारांसमोर आणला, तो मुद्दाम आणण्यात आला. उमेश घरडे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात 3 वर्षात एकही गुन्हा पोलिसांकडे दाखल नाही, तर तो गावगुंड कसा? त्याला जबरीने आणले व त्याच्याकडून काही गोष्टी वदवून घेण्यात आल्या. पत्रकारांच्या प्रश्नांनाही तो उत्तरे देऊ शकला नाही म्हणून त्याने पळ काढला आहे.

काँग्रेस पक्षात आतापर्यंत अनेक प्रदेशाध्यक्ष होऊन गेले. पण नाना पटोले या अध्यक्षांनी काँग्रेसची पत खराब केली. पटोले ज्यांना कधीही मारू शकतात, शिव्या घालू शकतात, असा व्यक्ती त्यांच्या समर्थनार्थ कसा काय समोर येऊ शकतो? त्यांचे वागणे दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेसला हे कळले पाहिजे. असे असले तरी पटोले यांना आम्ही सोडणार नाही. न्यायालयात दाद मागून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांनी पंतप्रधानांचा अपमान केला, हे आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com