नवाब मलिकांनी नाक घासून माफी मागावी; अन्यथा..

माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते व मंत्री नवाब मलिकांवर (Nawab Malik) जोरदार टीका केली आहे.
Nawab Malik & Anil Bonde
Nawab Malik & Anil BondeSarkarnama

अमरावती : अमरावती शहरात 13 नोव्हेंबर 2021 ला त्रिपुरा येथील कथीत घटनेवरुन झालेला हिंसाचार हा भाजप (BJP) नेते व माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंनी (Anil Bonde) घडवून आणला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. याबाबत आता बोंडे हे चांगलेच आक्रमक झाले आहे. याप्रकरणी मलिकांनी आपली बदनामी करणारी विधाने केल्याने अमरावती (Amravati) येथे येवून त्यांनी नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांना न्यायालयात खेचण्याचा इशाराही बोंडेंनी दिला आहे.

Nawab Malik & Anil Bonde
धनंजय मुंडे यांना आली जाग..

बोंडे म्हणाले, मलिक यांनी प्रसारमाध्यमांच्या व पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमरावती येथे झालेल्या हिंसाचारास जबाबदार धरत माझ्यावर बदनामी करणारी विधाने केली होती. ही दंगल घडवून आणण्यासाठी मी मुंबईतुन पैसा आणला व दारू पाजून दंगल घडवली, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता, त्यामुळे आज (ता.10 जानेवारी) बदनामी केल्याप्रकरणी मलिकांच्या विरोधात आपण राहत असलेल्या वरुड येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरी, मलिकांनी अमरावती येथील वरूड येथे येवून नाक घासून माफी मागावी अन्यथा त्यांना न्यायालयात खेचणार, असा इशारा बोंडेंनी दिला.

Nawab Malik & Anil Bonde
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण देशाला होतोय असाही फायदा!

दरम्यान, अमरावती येथे 13 नोव्हेंबरला त्रिपुरा येथील कथीत घटनेमुळे मोठा तणाव बघायला मिळाला होता. यामुळे दोन समाजात तेठ निर्माण झाले होते. यावरून महाराष्ट्रात चांगलेच राजकारण रंगले होते. याप्रकरणी राज्यातील भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले होते. याप्रकरणी बोलतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, १३ तारखेला जी घटना घडली ती १२ तारखेच्या हिंसाचाराची रिअॅक्शन होती, १२ तारखेची घटना पुर्णपणे डिलीट करुन १३ तारखेला घडलेल्या हिंसाचारावर पोलीस कारवाई करत आहेत. तसेच, १३ तारखेच्या घटनेवर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांनी १२ तारखेच्या हिंसाचारावरही कारवाई करावी, अशी मागणी फडणवीसांनीही त्यावेळी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com