केंद्रातील भाजप सरकार लवकरच बुडणार; देशात फिरसे काॅंग्रेस..

अमर,अकबर अँथनी या तिघांनी लोकांना न्याय दिला म्हणून हिट झाला. आम्हीही लोकांना न्याय देण्याचं काम करत आहोत.
केंद्रातील भाजप सरकार लवकरच बुडणार; देशात फिरसे काॅंग्रेस..
Nana Patole- News jalna

जालना ः देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे, जीडीपी दर हा साडेसात पेक्षा कमी आहे. देशाला आर्थिकदृष्ट्या बुडवणारे हे सरकार देखील लवकरच बुडणार असल्याचे भाकीत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. (The BJP government at the Center will soon sink; Congress in the country again) येणाऱ्या काळात आणि निवडणुकांमध्ये तुम्हाला देशात `फिरसे काॅंग्रेस` दिसेल, असा दावा देखील पटोले यांनी केला.

जालना येथे काॅंग्रेस मेळाव्याला मार्गदर्शन करण्यापुर्वी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ओबीसी आरक्षण, महागाईच्या मुद्यावरून त्यांनी केंद्रावर जोरदार टीका केली. (Congress State President Nana Patole, Maharashtra)  नाना पटोले म्हणाले, भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करण्यासाठी आहे का? असा प्रश्न पडतो.

भाजपने लोकांना फसवलं आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढताये. लोकांना खोटं बोलून भाजपने सत्ता मिळवली, आणि आता देशभरात महागाई वाढवी. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी सर्वात आधी काॅंग्रेसने केली होती. मी स्वतः विधानसभा अध्यक्ष असतांना सभागृहात ठराव मांडून या संदर्भातले आदेश दिले होते, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप  देवेंद्र फडणवीस करतात. परतु `फसनवीस`, सरकारनेच ओबीसींना फसवण्याचं काम केल्याचा पलटवार पटोले यांनी केला.

अमर,अकबर अँथनीचं हे सरकार आपापसातील भांडणातून पडेल, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, अमर,अकबर अँथनी या तिघांनी लोकांना न्याय दिला म्हणून हिट झाला. आम्हीही लोकांना न्याय देण्याचं काम करत आहोत, त्यामुळे आमचे सरकार देखील हीट आहे, असा टोला देखील पटोले यांनी लगावला. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in