भाजप पक्ष महाराष्ट्राचा शत्रू : जयंत पाटील

३१ मे नंतर लॉकडाऊन उठणार का, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, आम्ही २९, ३० मे रोजी याबाबत निश्चित काय ते जाहिर करू. पण ३१ तारखेनंतर लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय आम्ही घेणार आहोत. पण ज्या ठिकाणी रूग्ण संख्या जास्त आहे तेथे लॉकडाऊन कायम ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Jayant Patil
Jayant Patil

सातारा : कोरोनात लोकांना राज्याबाहेर जाण्यासाठी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च केल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल सांगत आहेत. मग महाराष्ट्रातून हे सर्वजण फुकट बाहेर जायला हवे होते. उलट आम्ही मुख्यमंत्री निधीतून हे पैसे खर्च केले आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे भाजप पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यातून सिध्द होतय,  अशी सडेतोड टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली

दरम्यान, विरोधी पक्ष नेता म्हणून एखादी गोष्ठ सांगताना विरोधकांची भुमिका सोडून राज्य सरकारच्या मागे उभे राहिले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी सरकार पडण्यासाठी ताकद लावण्यापेक्षा सरकारच्या मागे ताकतीने उभे राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आम्ही करत असलेल्या सगळ्या प्रयत्नात भाजप कुठेच दिसत नाही.हे महाराष्ट्रातील जनता लक्षात ठेवेल, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला. 

केंद्र सरकारने भरघोस मदत देऊनही महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरत आहे, अशी टिका काल भाजपचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आम्हाला केंद्राकडून काहीही मदत मिळालेली नाही. आम्ही मुख्यमंत्री निधीतून सर्व खर्च करत असल्याचे सांगत
कोरोनावर आम्ही यशस्वीपणे मात करून, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 
जयंत पाटील म्हणाले, आम्ही राज्यातसह मुंबईत केलेल्या विविध उपाय योजनांमुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूचा रेट कमी करण्यात यश मिळविलेले आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही दहा तज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे. यातील डॉक्टरांशी प्रत्येक जिल्ह्यातील डॉक्टर संपर्क करून कोरोनाच्या केसेसवर उपचार करत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ३५ हजार १७८ लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

कोरोनाच्या संसर्गाचा वेगावर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. अडीच दिवसांवरून तो १४ दिवसांवर आणला आहे. कोरोनाबाधित लोकांचा सर्व्हे करण्यासाठी १६ हजार टीम असून त्यांनी आतापर्यंत राज्यातील ६६ लाख लोकांचा सर्व्हे केला आहे. एकुण लोकसंख्येच्या ३० टक्के सर्व्हे पूर्ण केला आहे. मृत्यूदर दर कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. 

कोरोनात लोकांना राज्याबाहेर जाण्यासाठी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च दिल्याचे पियुष गोयल सांगत आहेत. मग महाराष्ट्रातून हे सर्वजण फुकट जायला हवे होते.
उलट आम्ही मुख्यमंत्री निधीतून हे पैसे खर्च केले आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे भाजप पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यातून सिध्द होते. केंद्र सरकारने पीपीई
किट आणि मास्क दिल्याचा दावा केला आहे. पण आमचा केंद्रशासनाशी कोणताही वाद नाही. त्यामध्ये आकडेवारीचा हिशोब त्यांनी सांगितला आहे.

 महाराष्ट्रात दहा  लाख पीपीई किट, १६ लाख मास्क व ४४७ कोटींची मदत दिली असे सांगत आहेत. मुळात त्यांनी दिले म्हणणे योग्य नाही. मागितलेनल्यापैकी मास्क पहिल्या टप्प्यात १३ लाख १३ हजार आले आहेत. पीपीई किट १७ लाख ९३ हजार मागितले होते. त्यापैकी शुन्य आले आहेत. ग्लोज २५ लाख २४ हजार मागितले होते, व्हेंटीलेटर्स, इन्फुयजन पंप मिळालेले नाहीत.

भाजपच्या नेत्यांनी आपण एखादी गोष्ठ सांगताना विरोधकांची भुमिका सोडून
सरकारच्या मागे उभे राहिले पाहिजे. सरकार पडण्यासाठी नव्हे तर सरकारच्या मागे उभे राहण्याची ताकद लावणे गरज आहे. राज्य सरकार करत असलेल्या सगळ्या
प्रयत्नात, उपाय योजनांमध्ये भाजप कुठेही दिसत नाही. हे महाराष्ट्रातील जनता आगामी काळात लक्षात ठेवेल.

आपल्या देशात कामगारांना संरक्षण देणारे कायद्यांचीच मोडतोड करा अशी केंद्र सरकार व भाजपची मानसितकता दिसत आहे. वन नेशन वन रेशन या योजनेची फेब्रुवारपर्यंत पुर्तता करणे अवघड जाणार आहे. कोरोनाशी मुकाबला करताना राज्य सरकार किती ही कर्ज काढू देत. पण केंद्र सरकारला राज्याला मदत करायची असेल तर खुल्या मनाने द्यावे. त्यासाठी अटी घालून पाश्चात्य देशाना जे घडवायचे आहेत ते भाजपने आपल्या देशात घडवू नये, असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला. 


उज्वला योजनेतून १६२५ कोटी खर्च करून ७३ लाख १६ हजार गॅस कनेक्शन दिल्याचे सांगत आहेत. मुळात सिलिंडरची किंमत पाहता त्यांचे हे आकडे चुकीचे वाटत
आहेत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले हे दाखविण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. सुधारणा करायची असेल तर सांगा माझा आजही दावा उत्तरप्रदेश, गुजरात,
अहमदाबाद, यांच्यापेक्षा जास्त चांगली व्यवस्था मुंबईत व महारष्ट्रात केलेली आहे.

आमच्याशी देशातील इतर कोणत्याच शहराशी तुलना होऊ शकत नाही. मुळात
मुंबईत  लोकसंख्येचे घनता अधिक आहे. त्यामुळे येथील कोरोनाची संख्या वाढलेली दिसते. तरी आमच्या लोकांनी सर्वांची सोय केलेली आहे. मुंबईत सर्व खासगी
हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथे उपचार सुरू आहेत. याची दखल गुजरातच्या न्यायालयाने घेऊन मुंबई सारखी उपाय योजना का करत नाही, असे गुजरात सरकारला
न्यायालयाने विचारले आहे. असे अनेक निर्णय आहेत जे महाराष्ट्राने घेतलेले आहेत त्याचे अनुकरण इतर राज्ये करायला लागली आहेत. 

३१ मे नंतर लॉकडाऊन उठणार का, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, आम्ही २९, ३० मे रोजी याबाबत निश्चित काय ते जाहिर करू. पण ३१ तारखेनंतर लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय आम्ही घेणार आहोत. पण ज्या ठिकाणी रूग्ण संख्या जास्त आहे तेथे लॉकडाऊन कायम ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com