नाना पटोलेंचा दावा खोडून काढत भाजप नगरसेवकाची पोलिसांत तक्रार...

चंद्रपूर शहरांमध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांचा समक्ष बोलत असताना भाजपचे काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतल्याचे व महानगरपालिका चंद्रपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे लेखी निवेदन त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
Nana Patole
Nana Patole

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये Chandrapur Municipal Corporation मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. हे सांगण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसचे नगरसेवक BJP and Congress Corporator आपल्याला भेटले. त्यांनी याबाबत तक्रार केली. तक्रारीनुसार महापालिकेत गंभीर भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले जातील, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना म्हटले. काल भाजप नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी नानांचा दावा खोडून काढत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

तक्रारीमध्ये नगरसेवक कंचर्लावार म्हणतात, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे म्हटले आहे की, भाजपच्या काही नगरसेवकांनी माझ्याकडे लेखी तक्रार केली. महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आणि सध्याही होत आहे. पण हे सांगताना पटोलेंनी त्या नगरसेवकांची नावे सांगितली नाहीत आणि त्यांच्या लेखी तक्रारीची प्रतही सादर केली नाही. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, असे त्यांनी म्हटल्यानंतर त्यामध्ये आम्ही सर्वच नगरसेवक आलो. त्यांच्या अशा कृत्यामुळे शहरात भाजपच्या सर्वच नगरसेवकांकडे संशयाने बघितले जात आहे. याचा आम्हा सर्वांनाच मोठा मनस्ताप होतो आहे. त्यामुळे रामनगर पोलिस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नाना पटोले यांनी त्याच पत्रकार परिषदेत भाजप नगरसेवकांची नावे जाहीर करायला पाहिजे होती, येवढेच आमचे म्हणणे आहे. जेणेकरून पक्षालासुद्धा आपल्या स्तरावर कार्यवाही करता आली असती. पण त्यांनी केलेला प्रकार हा केवळ आणि केवळ मनस्ताप देणारा आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले, असा दावा पत्रकार परिषदेत त्यांनी केला.  त्यामुळे भाजप व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप कंचर्लावार यांनी केला. 

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिनांक ८.६.२०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरांमध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांचा समक्ष बोलत असताना भाजपचे काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतल्याचे व महानगरपालिका चंद्रपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे लेखी निवेदन त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीत कंचर्लावार म्हणतात, मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य व कार्यकर्ता असून, महानगरपालिका चंद्रपूरमध्ये भानापेठ वॉर्डाचा नगरसेवक आहे. त्यामुळे मला या संपूर्ण परिस्थितीचा खूप मानसिक त्रास व शारीरिक त्रास होत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कधीही भेट घेतलेली नाही. तसे कोणतेही निवेदन कधीही दिलेले नाही. तरीसुद्धा माझ्या पक्षातील वरिष्ठांना तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला या बिनबुडाच्या वक्तव्यावरून उत्तरे द्यावी लागत आहेत. 

पटोले यांनी ज्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता भाजप पक्षावर व त्यांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर व नगरसेवकांची  जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत. हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय हेतू साध्य करण्याच्या व जनतेची दिशाभूल करण्याच्या वाईट हेतूने, भाजप पक्षाची व  नगरसेवकांची बदनामी करणारा आहे, असा आरोप नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com