ट्रान्सफार्मर मिळेपर्यंत भाजपचा बैठकांवर बहिष्कार; संभाजी निलंगेकरांचा जेलभरोचा इशारा

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत केवळ चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत येत असून जोपर्यंत शेतकर्‍यांना डिपी मिळणार नाही तोपर्यंत भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम असेल असे सांगितले.
ट्रान्सफार्मर मिळेपर्यंत भाजपचा बैठकांवर बहिष्कार; संभाजी निलंगेकरांचा जेलभरोचा इशारा
BJP boycotts meetings till getting transformers; Sambhaji Nilangekar's warning to jail

लातूर : शेतकऱ्यांना विज ट्रान्सफार्मर देण्याबाबत महावितरण विभाग समाधानकारक कार्यवाही करत नसल्याने आज (शनिवारी) झालेल्या लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपा लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका मांडली. शेतकरी हितासाठी भाजप बांधील असून जोपर्यंत शेतकर्‍यांच्या शेतात ट्रान्सफार्मर बसत नाही. तोपर्यंत आगामी होणार्‍या शासकीय बैठकांवर बहिष्कार टाकण्यांची घोषणा करत भाजप लोकप्रतिनिधींनी बैठकीवर बहिष्कार टाकला. या प्रकरणी ठोस कार्यवाही न झाल्यास आगामी काळात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. BJP boycotts meetings till getting transformers; Sambhaji Nilangekar's warning to jail

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीलाच महावितरण कारभाराचा निषेध व्यक्त करत यापूर्वी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत महावितरण अधिकार्‍यांना आदेश देऊनही अद्यापर्यंत ज्या शेतकर्‍यांनी विद्युत डिपीची मागणी केली आहे. त्यांना डिपी मिळाली नसल्याची तक्रार भाजपा लोकप्रतिनिधींनी केली.

भाजपा लोकप्रतिनिधींच्या सुरात सुर मिळवत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी सुद्धा महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला. आधीच चढ्या दराने काळ्या बाजारातून शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदी करावी लागली आहेत. सध्या पावसाने ओढ दिली असून हातातोंडाशी आलेल्या खरीपाची पिके वाळून जात आहेत.  तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भिती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. शेतात पाणी असूनही विजेअभावी शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नाही.

विद्युत डिपी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विज मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी सातत्याने करीत आहेत. विद्युत डिपीसाठी महावितरण कार्यालयात खेटे घालूनही अधिकारी वर्ग डिपी उपलब्ध करून देत नाहीत, असे शेतकर्‍यांकडून सातत्याने सांगण्यात येते. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारही केलेली आहे. याप्रकरणी मागील झालेल्या नियोजन बैठकीतही भाजपा आमदार व सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

याबाबत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा करून तात्काळ ज्या शेतकर्‍यांनी विद्युत डिपीची मागणी केली आहे. त्यांना डिपी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिलेले होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतरही महावितरणने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केलेली नसून अजूनही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी विद्युत डिपीच्या प्रतिक्षेत आहेत. ऑईल उपलब्ध नसल्याने डिपी दिली जात नाही अशी सबब महावितरण अधिकार्‍यांनी बैठकीत सांगताच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आक्रमक भुमिका घेतली.

यापूर्वीही सांगून महावितरण शेतकर्‍यांना डिपी उपलब्ध करून देत नाही आणि आता खोटी माहिती देत दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे सांगितले. आमदार निलंगेकरांना जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार  अभिमन्यु पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह भाजपा सदस्यांनी पाठबळ देत शासन व प्रशासनाच्या भुमिकेचा निषेध व्यक्त केला. शेतकरी हितासाठी भाजपा बांधील असून जोपर्यंत शेतकर्‍यांच्या शेतात डिपी बसणार नाही, तोपर्यंत भाजपा आगामी शासकीय बैठकांवर बहिष्कार घालत असल्याचे सांगत भाजपा सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही बहिष्कार टाकत सभागृहाच्या बाहेर पडले.

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत केवळ चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत येत असून जोपर्यंत शेतकर्‍यांना डिपी मिळणार नाही तोपर्यंत भाजपा आपल्या भुमिकेवर ठाम असेल असे सांगत लवकरच याबाबत ठोस कार्यवाही नाही झाल्यास भाजपाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही आमदार निलंगेकरांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.