आमदार कल्याणशेट्टी म्हणतात, सर्व निकाल येऊ द्या... अक्कलकोट आमचाच गड! - Big blow to BJP MLA Sachin Kalyanshetti in Akkalkot | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार कल्याणशेट्टी म्हणतात, सर्व निकाल येऊ द्या... अक्कलकोट आमचाच गड!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे  आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात अक्कलकोटमध्ये चुरस 

अक्कलकोट : भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांच्यात चुरस आहे. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींवर आपलाच  झेंडा फडकला असल्याचा दावा कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांच्या समर्थकांनी केला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रे यांचा तालुक्यात पराभव केला होता. तसेच सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही या तालुक्यातील भाजपला भऱघोस मतदान झाले होते. पण ग्रामपंचायत निवडणूक म्हेत्रे यांनी प्रतिष्ठेची केली होती. 

तालुक्यातील बादोले आणि बबलाद ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता आली आहे. बबलाद ग्रामपंचायतीत राजकुमार लकबशेट्टी यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागा मिळाल्या आहेत. तर बादोले ग्रामपंचायतीत कॉंग्रेसच्या माणिक धायगोडे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले. बादोलेतील 11 च्या 11 जागांवर धायगोडे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

तसेच साफळा ग्रामपंचायत 7 पैकी 5 जागा, सिंदखेडमध्ये 7 पैकी 4 जागा, मोट्याळमध्ये 7 पैकी 4 जागा, इब्राहिमपूर, हालहळ्ळी,  चप्पळगाववाडी व ब्यागेहळ्ळी या चारही ग्रामपंचायतीतील प्रत्येकी 7 पैकी 7 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बोरोटी बु., बबलाद, व हिळ्ळीमध्ये प्रत्येकी 9 पैकी 6,  गौडगाव खु.मध्ये 7 पैकी 5, खैराटमध्ये 7 पैकी 5 आणि डोंबर जवळगामध्ये 9 पैकी 7 जागांवर विजय प्राप्त केला आहे. या विजयामुळे म्हेत्रे यांनी तालुक्यात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

सर्व गावांचा निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती या भाजपकडेच राहतील, असा विश्वास कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. 

माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावातच भाजप पराभूत

माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी सात जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. हा राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांचे जामखेड तालुक्यातील वर्चस्व वाढत असल्याचे या निकालांमुळे स्पष्ट होत आहे.

भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे. गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. असे असले तरी त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील यांनी निवडणूक लढविली.

Edited By Rajanand More 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख