बिचुकलेंना आता आमदार व्हायचंय...राज्यपालांकडे केला थेट अर्ज

काहीजण म्हणतात राजू शेट्टींना घ्या, कोणी म्हणतात नार्वेकरांना घ्या, या लोकांचे हेच चालले आहे. यांनी सर्वांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी ३५ वर्षांपूवीची युती शिवसेने तोडली. हिंदूत्वाला काळीमा फासला. राज्यपाल तुम्ही जिनिअस असून शिक्षण तज्ञ आहात. विद्यापीठाचे बॉडी मेंबर आहात. त्यामुळे मला विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करा.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukale

सातारा : साताऱ्यातील ही कवी मनाचा नेता, गीतकार अभिजित बिचुकले यांनी चक्क राज्यपालांना ईमेल व व्टिटरच्या माध्यमातून पत्र पाठवून कला क्षेत्रातून विधान परिषदेवर घेण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ही टिका केली आहे. मुळात राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यानंतर मुख्ममंत्री त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करते. मात्र, अभिजित बिचुकलेंनी मात्र, थेट राज्यपालांकडे अर्ज केला आहे.   

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी गंमतीने म्हणतात, मी कोणालाही घाबरत नाही. फक्त अभिजित बिचुकलेला घाबरतो. अशा या वेगळ्याच ढंगातील अवलिया अभिजित बिचुकले स्वतःला कवी मनाचा नेता मानतो. विशेष म्हणजे त्याचे एक गाणेही यु टूबवर प्रसिध्द झालेले आहे. आपल्या विविध कारनाम्यांमुळे सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातही अभिजितचे नाव मिस्किलपणे घेतले जाते.

यापूर्वी अभिजितने लोकसभा, विधानसभा, कडेगाव विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विश्वजित कदम यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या विरोधातही निवडणुक लढविली होती. अगदी राष्ट्रपती पदासाठीही इच्छुकता दाखविण्यात त्याने मागे पुढे पाहिलेले नाही. आता विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त आहेत. या जागांवर कला, सामाजिक, क्रिडा, उद्योग आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अव्वल दर्जाच्या लोकांना  राज्यपालांकडून विधान परिषदेवर घेतले जाते.

सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्तेत असलेल्या नेत्यांनी या जागांवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असतानाच साताऱ्यातून एक अवलिया व कवी मनाचा नेता अभिजित बिचुकले यांनी थेट राज्यपालांना ई मेल व व्टिटरच्या माध्यमातून आपल्याला कला क्षेत्रातून
विधान परिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

 अभिजित बिचुकलेंनी राज्यपालांना केलेल्या विनंती मध्ये म्हटले की,  विधान परिषदेच्या १२ जागांवर विशेष प्राविण्य असलेल्या व्यक्तींची निवड राज्यपालांनी करायची आहे. मात्र, राजकीय लोक पवार साहेब असतील ठाकरे साहेब असतील, ते स्वतःचेच घोडे आणायला लागले आहेत.  मी २५ तारखेला तुम्हाला ई मेल व्दारे व व्टिटरच्या माध्यमातून माझी विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

मी कवी व गीतकार असून महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्यक्ती असून साताऱ्यात मी प्रचंड चांगल्याप्रकारे येथील प्रस्तापित नेत्यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहे. मात्र, मी कवी व कलाकार असल्याने सुप्रसिध्द  व निर्व्यसनी व्यक्ती असून समाजाची जान असलेला बहुजन समाजातील मी कलाकार आहे. मला विधान परिषदेवर नियुक्त करावे.

काहीजण म्हणतात राजू शेट्टींना घ्या, कोणी म्हणतात नार्वेकरांना घ्या, या लोकांचे हेच चालले आहे. यांनी सर्वांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी ३५ वर्षांपूवीची युती शिवसेने तोडली. हिंदूत्वाला काळीमा फासला. राज्यपाल तुम्ही जिनिअस असून शिक्षण तज्ञ आहात. विद्यापीठाचे बॉडी मेंबर आहात. त्यामुळे मला विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करा. मला तुमच्यामुळे आमदारकीची संधी मिळाल्यास डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार बहुजनांचे हित पाहिन.

माझ्यावर ही अन्याय झालेला आहे. बी बॉसमध्ये माझ्यावर अन्याय झाला. खाकीवर्दी वाल्यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यांना ही शहाणपण शिकवायचे आहे. पण याबाबत मी नंतर बोलेन. पण आता मी एकच विनंती करतो, कोणत्याही राजकिय नेत्याला या जागांवर निवडू नका. संविधानामध्ये लिहिलेल्या गोष्टीत खास प्राविण्य असलेल्या व्यक्तींना संधी देण्यात यावी असे, म्हटलेले आहे. त्यामुळे कलाकार म्हणून मला विधान परिषदेवर संधी द्या, असे त्यांन नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com