बीडच्या घटनेने काळिमा, महिला सुरक्षेसाठी कृती आरखडा हवा .. 

मंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज, द्यावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेपत्राद्वारे केली आहे.
Pravin darekar news Mumbai
Pravin darekar news Mumbai

मुंबई ः बीडमध्ये तरुणीला अॅसीड-पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याने महिला सुरक्षेसाठी तात्काळ कृती आराखडा बनविण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रत्येक आठवड्याला महिलांचा विनयभंग, बलात्कार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही शासन अजून गंभीर नाही, हे राज्य सरकारला लांच्छनास्पद आहे, असेही दरेकर म्हणाले.

ऐन दिवाळीत बीडमधील या 22 वर्षीय तरुणीला ठार मारण्यात आले, हाथरसच्या नावाने गळा काढणाऱ्यांचा गळा आता कोणी धरला आहे? कोणत्याही विषयाचे राजकारण करू नका असे म्हणणाऱ्या या निगरगट्ट सरकारला कधी जाग येणार? या राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असे प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केले आहेत.

मंदिराशेजारील स्टॉलना अर्थसाह्य

भारतीय जनता पार्टीच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतानाच मंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज, द्यावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  

मार्च महिन्यापासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरांच्या आवारातील अनेक छोटया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. या व्यावसायिकांमध्ये फूल विक्रेते, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांचा समावेश आहे. आता मंदिरे सुरू झाल्यानंतर त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची चणचण भासत आहे.

त्यामुळे सरकारने छोट्या व्यावसायिकांना तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्जाची परतफेड छोटे व्यावसायिक नियमितपणे करतील. शासनाने याकरिता बॅकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना द्याव्यात व व्याजाची रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com