#Corona Effect : बबनराव पाचपुते गुंतलेत ट्रॅक्टरच्या नांगरटीत

पाचपुते म्हणाले,१९७७ मध्ये आमच्या वडीलांनी ( भिकाजीराव पाचपुते) यांनी ट्रॅक्टरघेतला. त्याकाळी ट्रॅक्टर असणारे मोजकेच शेतकरी होती. त्यावेळी गव्हाचे मळणी यंत्र या ट्रॅक्टरला जोडून तालुक्यासह शेजारी पुणे जिल्ह्यातील अनेक गावे फिरुन आलो आहे.
tractor driving
tractor driving

श्रीगोंदे (नगर) :  बबनराव पाचपुते हे नाव जेष्ठ नेते म्हणून गाजत असले तरी ते हाडाचेशेतकरी आहेत. बैलाची नांगरट करणे, मोट हाकणे आदी कामे त्यांनी सुरुवातीपासूनच केली आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना त्यामुळेच त्यांना समजतात असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. पण त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कोरोनामुळे घरीच असणारे श्री. पाचपुते सध्या मतदारसंघाचा आढावा फोनवरुन घेत असतानाच ट्रॅक्टर घेऊन थेट शेतातील नांगरट करण्यात गुंतले आहेत.


विधानसभेतील अनुभवी आमदार असणाऱ्या बबनराव पाचपुते सध्या काय करतात, असे जर कुणी विचारले तर त्याचे उत्तर शेतातील सगळी कामे ते लिलया करुन घेतच नाहीत, तर स्वतः  करीत आहेत. नेतेगिरी करणारे शेतात राबू शकतात का, असे म्हटले जाते. पण याचे उत्तम उदाहरण बबनवराव पाचपुते यांनी घालून दिले आहे. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरातच असणाऱ्या पाचपुते यांनी आता शेताकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. गेल्या चाळीस वर्षात लोकांच्या व्यापात त्यांना शेतात जाण्यास वेळच मिळाला नाही. मात्र, आता कोरोनाच्या आपत्ती त्यांच्यासाठी ही चांगली बाब झाली असेच म्हणावे लागेल. त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह याला घेऊन श्री. पाचपुते यांनी शेतातील फळबागेची पाहणी करीत होते. त्यावेळी ट्रॅक्टरची नांगरट सुरु होती. ट्रॅक्टर चालकाला थांबवून त्याची चूक दाखविली आणि 'हो बाजूला' असे म्हणत स्वत:च वरती बसले. 

तेथे उपस्थितीत असणाऱ्या मोजक्या लोकांना कुतूहल वाटले. मात्र, पाचपुते यांनी चक्क अर्धा तास अगदी बारकाईने शेताची मशागत केली. पाचपुते सांगत होते, १९७७ मध्ये आमच्या वडीलांनी ( भिकाजीराव पाचपुते) यांनी ट्रॅक्टर घेतला. त्याकाळी ट्रॅक्टर असणारे मोजकेच शेतकरी होती. त्यावेळी गव्हाचे मळणी यंत्र या ट्रॅक्टरला जोडून तालुक्यासह शेजारी पुणे जिल्ह्यातील अनेक गावे फिरुन आलो आहे. 

सध्या कोरोनामुळे वेळ आहे. लोकांच्या समस्या फोनवरुनच सोडवून आता शेताकडे लक्ष देतोय. पण आजही आपण उत्तम शेती करुन दाखवू शकतो. त्यामुळेच शेतीचे खरे
प्रश्न आपल्याला समजतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com