स्वातंत्रदिनी या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न..

पालकमंत्री अब्दुल सत्तार हे ध्वजारोहनाच्या कार्यक्रमासाठी येण्याआधी एका महिलेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली.
4Pune_20police.jpg
4Pune_20police.jpg

धुळे / सातारा : आज देशभरात ७४ वा स्वातंत्रदिन साजरा करण्यात येत आहे.  देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना काही ठिकाणी मात्र या सोहळ्याला गालबोट लागण्याचा प्रयत्न झाला. असाच एक प्रकार धुळे येथे घडला. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्री अब्दुल सत्तार हे ध्वजारोहनाच्या कार्यक्रमासाठी येण्याआधी एका महिलेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली. या महिलेला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तिच्या घरावर दरोडा पडल्याने महत्वाचे दस्ताऐवज आणि सोने, रोख रक्कम आदी चोरी झाली आहे. याची पोलिसांनी अद्याप दखल घेतली नाही, त्यामुळे आपली व्यथा मांडण्यासाठी या महिलेने पालकमंत्र्यांसमोर गोंधळ केला. 

दुसरी घटना ही साताऱ्यात घडली. साताऱ्यात नलावडे कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी नलावडे कुटुंबियांची 41 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप नलावडे कुटुंबीयांनी केला आहे. या नलावडे कुटूंबियांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी एकास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

फसवणूकीचा आरोप करत या नलावडे कुटूंबियांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज स्वातंत्र्यदिनी या नलावडे कुंटुबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. यावेळी ज्योती नलावडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  "आजपासून राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनला सुरवात करण्यात येणार आहे. देशातील प्रत्येकाला हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्या व्यक्तीच्या  आरोग्याची माहिती त्यात असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. "आपण किती दिवस कच्च्या माल आयात करत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल,"  असेही मोदी यांनी आज सांगितलं. आज 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.  मोदी यांनी  सातव्यांदा लाल किल्ल्यावरून झेंडावंदन केले.  

मोदी म्हणाले, " आज नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे. कोरोना काळात संकल्प करणं आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत हा देशासाठी मंत्र आहे.  आत्मनिर्भर बनणं सध्या आवश्यक आहे. देशातील जनता जो संकल्प करते तो जिद्दीने पूर्ण करते. माझा या देशातील तरूण आणि महिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. कृषी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला आहे, देशाला अधिक आत्मनिर्भर करण्यासाठी व्होकल आॅफ लोकलसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचं मोठ योगदान आहे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com