मुंबई पोलिसांचे हात कुणी बांधले होते? आशिष शेलार यांचा सूचक सवाल

"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही! "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?,'' असेही प्रश्न शेलार यांनी व्यक्त केले आहेत.
BJP Leader Ashish Shelar Questions about SSR Sucide Case
BJP Leader Ashish Shelar Questions about SSR Sucide Case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही, असा सवाल भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केला आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे.या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे, याबाबत आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली आहे. 

''कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?," असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!  "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे.  पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही?  कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?,'' असेही प्रश्न शेलार यांनी व्यक्त केले आहेत. 

दुसरीकडे अभिनेता सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीने आपली अधिकृत बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडली आहे. त्यात शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा आपला काहीही संबंध नसून, त्यांना कधीही भेटलेली नाही. त्यांच्याशी कधीही फोनवरून बोलणे झालेले नाही. केवळ ते शिवसेनेचे नेते आहे. इतकीच माहिती असल्याचे म्हटले आहे. रियाच्या वतीने तिचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी हे  स्टेटमेंट जारी करण्यात केले आहे.

आपल्या स्टेटमेंटमध्ये रियाने काही खुलासे केले असून, त्यात आदित्य ठाकरे यांच्याशी आजपर्यंत कधी भेट झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. अभिनेता डिनो मोर्या यांना आपण ओळखत असून, ते चित्रपटसृष्टीमध्ये वरिष्ठ अभिनेता आहेत. तसेच आपण सक्तवसुली संचनालय (ईडी) व मुंबई पोलिस दोघांनाही तपासात पूर्णपणे सहकार्य करत असल्याचेही रियाने म्हटले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com