कोरोनाचा कहर : साताऱ्यात नवीन ५२ रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू  

आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात 394 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर 257 रुग्णांवर उपचार सुरु असून 1२ जणांचा मृत्यु झालेला आहे.
corona satara
corona satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना संशयित म्हणून उपचार घेत असलेल्या ५२ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वाई तालुक्यातील जांभळेवाडीतील एक ज्येष्ठ नागरीक, जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील ज्येष्ठ महिला व माण तालुक्यातील भालवडी येथील ज्येष्ठ  नागरीक असे तिघांचा मृत्यू झाला असून आत मृतांचा आकडा १२ झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

कोरोनाची साखळी जिल्ह्यात तुटेना झाली आहे. कालचा एक दिवस वगळता उर्वरित दिवशी कोरोनाबाधित रूग्ण सापडण्याचे आकडे वाढत आहेत. काल रात्री तब्बल
५२ रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या ३९४ झाली असून २५७ जणांवर उपचार सुरू आहेत.

काल रात्रीत सापडलेल्या ५२ रूग्णांमध्ये  माण तालुक्यातील पाच, खटाव दोन, सातारा तीन, वाई सहा, पाटण १०, खंडाळा ११, जावली पाच,  महाबळेश्वर तालुक्यात सहा, कऱ्हाड तीन, फलटण एकारूग्णांचा समावेश आहे. तालुकनिहाय बाधितांची आकडेवारी अशी आहे. माण तालुक्यातील म्हसवड येथील 48 वर्षीय पुरुष, तोंडले येथील 58 वर्षीय पुरुष, भालवडी 62 वर्षीय पुरुष (मृत्यु), लोधवडे येथील 34 वर्षीय व 28 वर्षीय महिला. 

खटाव तालुक्यातील वांझोली येथील 52 वर्षीय पुरुष व अंभेरी येथील 14 वर्षीय युवक. सातारा तालुक्यातील खडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील 21
वर्षी युवक, कुस बुद्रुक 45 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील 58 वर्षीय पुरुष, आसले येथील 40 वर्षीय पुरुष, मालदपूर येथील 24 वर्षीय पुरुष, देगाव येथील 55 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, धयाट येथील 52 वर्षीय पुरुष.

पाटण तालुक्यातील धामणी येथील 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, जांभेकरवाडी 70 वर्षीय महिला, गमलेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, मान्याचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, मोरगिरी येथील 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव येथील 35 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे येथील 47 वर्षीय महिला, पारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52  वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष.


जावली तालुक्यातील सावरी येथील 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर येथील 16 वर्षीय युवक 44 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील कासरुंड येथील 26 वर्षीय पुरुष  व 18 वर्षी युवक, देवळी येथील 9 वर्षाचा मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील 42 वर्षीय महिला. कराड तालुक्यातील* खराडे येथील 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 20 वर्षीय युवती.
फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.


तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 97 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 59 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविले आहेत, अशी माहितीही जिल्हाशल्यचिक्सिक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com