काळ्याचे पांढरे करण्यात ऋषिकेशने अनिल देशमुखांना मदत : ED चा आरोप
Anil Deshmukh &Hrishikesh DeshmukhSarkarnama

काळ्याचे पांढरे करण्यात ऋषिकेशने अनिल देशमुखांना मदत : ED चा आरोप

पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरू आहे, असा दावा ऋषिकेश (Hrishikesh Deshmukh) यांनी जामीन अर्जात केला आहे.

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांचा सक्रिय सहभागी होता. वडिलांनी गैरमार्गाने मिळवलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

Anil Deshmukh &Hrishikesh Deshmukh
एसटी संपावर वेतनवाढीचा तोडगा?

देशमुख यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला ईडीने एका प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ऋषिकेशचा सक्रिय सहभाग आहे. मनी लाँडरिंगचा पैसा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखवण्यात ऋषिकेशने देशमुख यांना मार्गदर्शन केले, असा गंभीर आरोप ईडीच्या वतीने केला आहे. ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असे ईडीने म्हटले आहे. ऋषिकेशला आतापर्यंत सहा वेळा समन्स बजावले. मात्र, तो सहकार्य करत नाही, असा आरोप ईडीने केला आहे.

Anil Deshmukh &Hrishikesh Deshmukh
सर्वोच्च न्यायालयाचा परमबीरसिंहांना दिलासा अन् महाराष्ट्र सरकार, सीबीआयला नोटीस

पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास

ईडी जाणीवपूर्वक या प्रकरणात आम्हाला अडकवत आहे आणि पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरू आहे, असा दावा ऋषिकेश यांनी जामीन अर्जात केला आहे. त्यांच्या अर्जावर ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in